आ. विनाकराव पाटलांच्या आमरण उपोषणाला पाठींबा वाढू लागला चाकूर बंदचे आवाहन

Tuesday, February 5, 2019


चाकूर: अहमदपूर, चाकूर विधानसभा मतदार संघाचे आमदार, माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी चाकूर तालुक्यातील शेतकर्‍यांना व अहमदपूर तालुक्यातील कांही शेतकर्‍यांना पीकविमा मिळालेला नाही त्या संदर्भात व पिकविता तात्काळ मिळावा म्हणून आमरण उपोषण सुरु केले आहे. या आमरण उपोषणाला दुसर्‍या दिवशी पाठींबा वाढत चालला असून सत्ताधारी आमदारांना रास्त आणि न्याय प्रश्‍नासाठी विमा कंपनीच्या विरोधात आमरण उपोषण करण्याची जी वेळ आली आहे त्यासंदर्भात सच्चा लोकप्रतिनिधी म्हणून आ. विनायकराव पाटील यांचे अभिनंदन होत आहे. त्याचबरोबर विविध व्यक्ती, संघटना त्यांना पाठींबा देत आहेत.

काल आ. विनायकराव पाटील यांनी आपलं आमरण उपोषण सुरु केलं तेंव्हा शिवसेनेचे नेते सुभाष काटे यांनी स्वतः उपस्थित राहून पाठींबा दिला. तसेच अनेक लोकप्रतिनिधी, मार्केट कमिटी, नगर पंचायत व त्याचबरोबर पक्षाचे प्रतिनिधी या आमरण उपोषणास पाठींबा देण्यासाठी हजर राहत आहेत. आज वकील मंडळाने या आंदोलनास पाठींबा दिलेला आहे. तसेच उद्या बुधवार, दि. ६ फेब्रुवारी रोजी चाकूर बंदचे आवाहन करण्यात आलेले आहे.


आमच्या बातम्या आपल्या मोबाईल वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 

आ. विनायकराव पाटील हे सातत्याने, रास्त आणि न्याय प्रश्‍नासाठी निर्भिडपणे लोकांच्या सोबत राहतात, लोकांना न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न करतात आणि वेळप्रसंगी शांत स्वभावाचे वाटणारे आमदार विनायकराव पाटील हे जनतेसाठी आक्रमक होतात. म्हणूनच विविध लोकप्रतिनिधी व सर्वसामान्य जनता ही त्यांच्यासोबत आहे. हे आंदोलन चिघळू नये. तात्काळ न्याय मिळावा असे लोकांचे प्रयत्न आहेत. दरम्यान, तहसीलदार यांनी आंदोलनस्थळी भेट देवून आंदोलन मागे घेण्यासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांचे पत्र दिले पण विमा कंपन्यांचे अधिकारी ज्या विचित्र पद्धतीने पूर्ण चाकूर तालुका डावलला आहे. या विमा कंपनीच्या यंत्रणेचा जाहीर निषेध आ. विनायकराव पाटील यांनी केला असून हा प्रश्‍न लवकर सुटावा यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, जिल्हाधिकार्‍यांनाही अगोदर निवेदन दिले होते.

आमचा प्रतिनिधी कळवतो की, तात्काळ उपोषण होताच पैशाच्या बॅगा आणून कोणीही पिकविमा देणार नाही पण एकट्या चाकूर तालुक्यातील शेतकर्‍यांनी शासनाने व केंद्र शासनाने मिळून जवळ जवळ ५ कोट रुपयाहून जास्त विम्याचा हप्ता भरलेला आहे. योगायोगाने पिक परिस्थिती वाईट आहे आणि अशा परिस्थितीत चुकीच्या पद्धतीने कागदी मेळ घालून जो शेतकर्‍यांना त्यांच्या हक्कापासून डावललं जात आहे याचा जनता तिव्र शब्दात निषेध करत आहे. आज आमरण उपोषणाचा दुसरा दिवस. दुपारपर्यंत किंवा ही बातमी प्रसारीत करेपर्यंत अद्याप शासन हा विषय गांभीर्याने घेत नसल्याचे दिसत असून वाढता पाठींबा हे आमदार विनायकराव पाटलाच्या लोकांसोबतच्या भूमिकेचे महत्त्वाचे धोरण ठरत आहे.

No comments:

Post a Comment