सुप्त कलागुणामुळेच मी जिल्हाधिकारी पदापर्यंत पोहंचलो : जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांचा कानमंत्र

Tuesday, February 5, 2019

लातूर, दि. ५ ः....
विद्यार्थ्यांनी फक्त पुस्तकी किडे न बनता आपल्या व्यक्तीमत्वाचा विकास करण्यासाठी कला, सांस्कृतीक व क्रिडा क्षेत्रात सहभागी झालं पाहिजे आणि सुप्त कला गुणामुळेच मी जिल्हाधिकारी पदापर्यंत पोहंचलो, असं मत लातूरचे कर्तव्यदक्ष व लोकप्रिय जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केले. ते प्रदूषण मंडळाच्यावतीने आयोजित कै. श्रीराम गोजमगुंडे एकांकी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी उच्चत्तम कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती ललितभाई शहा, गटविकास अधिकारी तृप्ती अंधारे, अविष्कार गोजमगुंडे, विक्रांत गोजमगुंडे, दिपरत्न निलंगेकर हे व्यासपीठावर होते.

प्रदूषण मंडळाच्यावतीने निसर्गाचं संतुलन राहावं आणि यासंदर्भात वेगवेगळ्या एकांकीका स्पर्धा घेतल्या जातात. यासंदर्भात बोलतांना जी. श्रीकांत म्हणाले की, येणार्‍या काळात निसर्गाचं संतुलन राखणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी वृक्षारोपण, जलपुनर्भरण आणि लहान मुलांमध्ये विविध मार्गाने जागृती होणं गरजेचं आहे, तरच देश आणि जग टिकेल. हे सांगून जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी मी परिस्थितीनं घाबरुन न जाता कठोर परिश्रमातून, आत्मविश्वास न ढळू देता विविध क्रिडा, नाट्य, गायन या क्षेत्रात सहभागी झालो यामुळं माझे मनोधैर्य, स्टेजकरेज, लोकसंपर्क वाढत गेला.

 मी जाणीवपूर्वक वेगवेगळ्या पद्धतीनं विकास कसा करता येईल यासाठी प्रयत्न केले आणि त्यातूनच मी घडलो. युवकांनी मोबाईलचा सकारात्मक वापर करावा, वाचन, लिखाण वाढवून संगीत, कला, या क्षेत्रात पुढाकार घ्यावा, सहभाग नोंदवावा आणि वेगवेगळ्या क्षेत्रात अतीउच्च पदावर जाण्याचा निर्धार करावा, असा कानमंत्री दिला.

 यावेळा सभापती ललितभाई शहा यांनी जीवन एक नाटक आहे आणि या नाटकात प्रामाणिकपणे आपली भूमिका बजावावी असं सांगितलं तर दिपरत्न निलंगेकर यांनी माझे नाट्यक्षेत्रातील गुरु श्रीरामजी गोजमगुंडे यांनी अनेक कलावंत घडवले, येणार्‍या काळात त्यांना व्यासपीठ मिळावं या हेतुनं आम्ही हे आयोजन करत असल्याचे सांगितले. यावेळा सूत्रसंचालन सुशील सूर्यवंशी यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत संयोजकांच्यावतीने करण्यात आले. एकंदरीत जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या कानमंत्राने विद्यार्थ्यांत सकारात्मक ऊर्जा मिळाली. 

No comments:

Post a Comment