देशात २०२२ पर्यंत प्रत्येकाला मिळणार हक्काचे घर !

Wednesday, December 19, 2018
मुंबई : देशात प्रत्येकाला हक्काचे घर देण्यासाठी पंतप्रधान आवास योजना राबवण्यात येत आहे. मागील सरकारने २५ लाख ५० हजार घरेच तयार केलीत. आम्ही मात्र अवघ्या चार वर्षांतच पाच पट जास्त म्हणजे १ कोटी २५ लाख घरे बांधली. आधीच्या सरकारच्या तुलनेत आमचे 'संस्कार, सरोकार आणि रफ्तार' वेगळे आहेत. 

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

पंतप्रधान आवास योजनेमध्ये आठ लाख घरे बांधण्यात आली आहेत. या ठिकाणी मागच्या सरकारमध्ये चर्चेत असलेली 'आदर्श' सोसायटी नव्हे, तर गरीबांना घरे देणारी, त्यांची स्वप्ने साकारणारी सोसायटी आम्ही बनवली आहे, असा टोला नरेंद्र मोदींनी काँग्रेसला लगावला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो प्रकल्पासह सिडकोच्या घरांचे भूमिपूजन मंगळवारी कल्याणमध्ये करण्यात आले. या वेळी त्यांनी केंद्रातील भाजपा सरकारकडून राबवण्यात येत असलेल्या विविध योजनांचा लेखाजोखा सादर करत आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा जणू नारळच फोडला. 

२०२२ पर्यंत मुंबईत तब्बल २७५ किलोमीटर एवढे मेट्रोचे जाळे पसरवण्यात येणार असून ठाणे-भिवंडी व दहिसर-भाईंदर या मेट्रो प्रकल्पांमुळे मुंबईतील वाहतूक कोंडीही कमी होणार असल्याचा विश्वास पंतप्रधानांनी बोलताना व्यक्त केला. 

त्याचप्रमाणे २०२२ पर्यंत प्रत्येकाला घर देण्याचा संकल्प आम्ही केला असून ९० हजार घरे उभारली जात आहेत. गेल्या चार वर्षांत आम्ही पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सुमारे १ कोटी २५ लाख घरे बांधली आहेत. हेच काम करायला मागील सरकारच्या दोन पिढ्या लागल्या असत्या, अशी टीकाही त्यांनी काँग्रेसवर केली. 

No comments:

Post a Comment