![]() |
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर
|
उस्मानाबाद: तरूणीस जबरदस्तीने पळवून नेल्याची घटना कळंब तालुक्यातील मोहा येथे घडली.याप्रकरणी एकाविरूध्द कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, गोजवाडा येथील एकाने २२ वर्षिय तरूणीस ४ डिसेंबर रोजी मोटारसायकलवरून जबरदस्तीने पळवून नेले. याप्रकरणी तरूणीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून ज्ञानेश्वर भिमा शिंदे याच्याविरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

No comments:
Post a Comment