बीडमध्ये २९ लाखांचा गुटखा जाळला !

Wednesday, December 19, 2018

बीड : गुटख्याची वाहतूक करणारा टेम्पो येथे विशेष पथकाने पकडला होता. यावेळी पकडलेला २९ लाख ६५ हजार किंमतीचा गुटखा पोलिसांनी न्यायालयाच्या परवानगीने मंगळवारी दुपारी ४ वाजता जाळला.

२९ ऑगस्ट २०१८ रोजी पहाटे बीड ते गेवराई दरम्यान पेट्रोलिंग करत असताना पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने पाडळसिंगीजवळ एक टेम्पो पकडला होता. त्यातून हैद्राबाद येथून गुटखा भरुन औरंगाबाद येथे अवैध विक्रीसाठी नेला जात होता.

या टेम्पोमध्ये २९लाख ६५ हजार रुपये किंमतीचा ५० पोती गुटखा आढळून आला होता. १५ लाखांच्या टेम्पोसह ४५ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला होता. मंगळवारी दुपारी ४ वाजता न्यायालयीन आदेशानुसार ताकडगाव रोडवरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या मागे हा गुटखा जाळून नष्ट करण्यात आला. 

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment