देवदर्शन करून परतणाऱ्या माय-लेकराचा अपघातात मृत्यू.

Wednesday, December 19, 2018
केज : तालुक्यातील घटना दुचाकीला भरधाव टेम्पोने उडवले तालुक्यातील उत्तरेश्वर पिंप्री येथे दर्शन घेऊन गावाकडे परतणाऱ्या माय-लेकराच्या दुचाकीला भरधाव टेम्पोने उडवले. यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि.१८) सायंकाळी घडली. 


कळंब तालुक्यातील करंजकल्ला येथील भागीरथी मच्छद्रिं कवडे (४५) व श्रीकांत मच्छद्रिं कवडे (२५) हे दोघे मंगळवारी केज तालुक्यातील उत्तरेश्वर पिंप्री येथे देवदर्शनासाठी आले होते. दर्शन घेऊन गावाकडे परतत असताना केज-चौसाळा रोडवरील चौफाळ्यावर चौसाळ्याहून केजकडे येत असलेल्या कापूस वाहतूक करणाऱ्या टेम्पोने (एम.एच. १० के. ७७७६) दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीवरील आई व मुलगा हे दोघेही ठार झाले. दुचाकी टेम्पोच्या मध्यभागी अडकल्याने दोघेही दूरवर फरपटत गेल्याने रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता.

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment