मेथीची भाजी खाल्याने एकाच कुटुंबातील सात जणांना विषबाधा

Saturday, December 22, 2018



उमरी/राजेश खांडरे वार्ताहर :- उमरी तालुक्यातील कळगाव येथे मेथीची भाजी खाल्याने विषबाधा होऊन एकाच कुटुंबातील सात जणांना विषबाधा झाल्याने त्यांना उमरी ग्रामीण रुगणालयात उपचारासाठी दाखल केले असता डाक्टरांनी प्रथम उपचार करुन सहा जणांना नांदेडला हलविण्यात आले तर कोँडीबा गंगाराम कदम वय ६५वर्ष यांचा रुगणालयात मृत्यू झाल्याची घटना २१डिसेंबर रोजी शुक्रवारी सकाळी कळगाव येथे घडली आहे .

उमरी तालुक्यातील कळगाव येथे मयत कोंडीबा गंगाराम कदम यांच्या घरी २०डिसेबर रोजी गुरुवारी सकाळी मेथीची भाजी केल्याने घराच्या सर्वच सदस्यानी भाजी खाल्याने त्यांना पोट दुखाल्यामुळे सर्वच सदस्यांनी गुरुवारी उमरी ग्रामीण रुगणालयात डाक्टरांना दाखवून बरं वाटत असल्याने सहा सदस्य घरी वापस गेले मात्र मयत कोंडीबा गंगाराम कदम यांना फारच संडास उल्टया होत असल्याने त्यांना ग्रामीण रुगणालयात अडमिट करुन घेण्यात आले सांयकाळी त्यांची तब्येत फारच बिघडल्याने त्यांचा गुरुवारी सांयकाळी६-००वाजता मृत्यू झाला.
त्यानंतर शुक्रवारी सकाळी १०-००वा भागाबाई गणपतराव पुयड ,आनंदा कोडीबा कदम वय३० वर्षे ,कल्पना कोंडीबा कदम वय २८ वर्षे ,पदमीनबाई मारोती कदम वय ४० वर्षे ,श्लोक शिवाजी कदम वय ४वर्षे ,
संभाजी सोपान शिंदे वय १५ वर्षे सर्व रा कळगाव या सर्वांना पोटात दुखुन मळमळ होऊन संडास उलटया होत असल्याने उमरी ग्रामीण रुगणालयात दाखल करण्यात आले असता डा आशिष कदम ,डा चव्हाण ,डा चंदापुरे यांनी सहा जणावर प्रथामिक उपचार केला मात्र परिस्थिती गंभीर दिसल्याने सहा जणांना नांदेडला येथील शासकीय रुगणालयात हलविण्यात आले आहे
.

No comments:

Post a Comment