Saturday, December 22, 2018December 22, 2018
हिंगोली / प्रतिनिधी
जिल्हास्तरावर विशेष दक्षता पथकांची नेमणुक करुन बोगस वैद्यकीय व्यावसायिकांविरुद्ध धाडसत्र मोहीम राबवून बोगस वैद्यकीय व्यावसायिकांवर आळा घालण्यासाठी कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित बोगस वैद्यकीय व्यावसायीकांवर आळा घालण्यासाठी व प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी गठीत जिल्हास्तरीय पुनर्विलोकन बैठकीत जिल्हाधिकारी जयंवशी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एच. पी. तूम्मोड, अतिरिक्त पोलीस अधिक्षक यशवंत काळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीवास, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, पोलीस उपअधिक्षक (गृह) सुजाता पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी जयवंशी पुढे म्हणाले की, बोगस डॉक्टरामुळे नागरिकांच्या जिवीतास धोका निर्माण होऊ शकतो. जिल्ह्यातील कार्यरत असलेल्या बोगस वैद्यकीय व्यावसायिकांची माहिती घेऊन दोषीविरुद्ध पोलीस विभागामार्फत रितसर कारवाई करावी. तसेच न्यायप्रविष्ट प्रकरणांतील दोषी आरोपी पुन्हा बोगस वैद्यकीय व्यवसाय करीत असेल तर त्यांच्या विरुद्ध आरोग्य विभाग आणि पोलीस विभागाने कडक कारवाई करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी जयवंशी यांनी दिल्या. जर आपल्या भागात कुठलीही मान्यता प्राप्त पदवी नसतांना एखादी व्यक्ती वैद्यकिय व्यवसाय करत असल्याचे आढळून आल्यास सदर गावातील पोलीस पाटील, ग्रामसेवक, सरपंच व तलाठी यांनी त्वरीत तहसिलदार, गटविकास अधिकारी यांना त्वरीत कळवावे अन्यथा संबंधीतांवर सहआरोपी म्हणून जबाबदार धरून कडक कार्यवाही करण्यात येईल, अशा देतांना जिल्हयातील सर्व जनतेने सतर्क राहून अशा बोगस वैद्यकिय व्यवसायिकांकडून कोणताही औषधोपचार घेवू नये व स्वत:च्या जिवीतास धोका निर्माण करू नये, असे आवाहनही जिल्हाधिकारी, रुचेश जयवंशी यांनी केले आहे.
बोगस वैद्यकीय व्यावसायीकांवर कायदेशीर कारवाई करा- जिल्हाधिकारी जयवंशी
By Marathwada Neta
Saturday, December 22, 2018

Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment