मोदी-शहाच्या जुलमी राजवटीला चपराक : राज ठाकरे

Tuesday, December 11, 2018

मुंबई : पाच राज्यातील निवडणुकींचे निकाल हे मोदी-शहाच्या जुलमी राजवटीला चपराक आहे. थापेबाजी जास्त दिवस चालणार नाही. निवडणुकीतील निकालातून मतदारांनी मोदी-शहाच्या मुजोर भाषेला उत्तर दिले आहे, असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निशाणा साधला. 

मंगळवारी राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरम येथील विधानसभा निवडणुकींचे निकाल जाहिर होणार आहेत. राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेस आघाडीवर असून भाजपाला जोरदार धक्का दिला आहे. निवडणुकींच्या या निकालांबाबत राज ठाकरे यांनी कृष्णकुंज निवासस्थानी मंगळवारी सायंकाळी पत्रकार परिषद घेतली.

निकालांची आकडेवारी पाहता भाजपाची उलटी गिनती सुरू झाली असल्याचे म्हणत राज यांनी मोदी सरकारवर तोफ डागली. भाजपावर ही वेळ येणारच होती. मोदींची लाट ओसरणार होती. याची सुरूवात त्यांच्या होम ग्राऊंडपासूनच झाली. गुजरातमधील जनतेने मोदी विरोधी कौल दिला, असे म्हणत राज यांनी मोदींवर निशाणा साधला. लोकं किती दिवस थापा ऐकणार? असा सवालही त्यांनी पुढे केला.

No comments:

Post a Comment