आरबीआय गव्हर्नरपदी शक्तिकांता दास!

Tuesday, December 11, 2018



मुंबई : माजी वित्त सचिव आणि वित्त आयोगाचे विद्यमान सदस्य शक्तिकांता दास यांची रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी नियुक्ती करण्यात आली. उर्जित पटेल यांनी काल, सोमवारी गव्हर्नरपदाचा राजीनामा दिल्यानंतर आज सरकारनं त्यांच्या जागी दास यांची नियुक्ती केली. 

शक्तिकांता दास हे तामिळनाडू केडरचे 1980 बॅचचे निवृत्त सनदी अधिकारी आहेत. आरबीआयचे गव्हर्नर होण्याआधी ते पंधराव्या वित्त आयोगाचे सदस्य होते. आय़एएस अधिकारी म्हणून त्यांनी केंद्र आणि तामिळनाडूमध्ये वेगवेगळ्या पदांवर सेवा बजावली होती.

आर्थिक, महसूल, खते या महत्वाच्या खात्यांचे ते सचिव होते. दास यांनी महिंद्रा वर्ल्ड सिटीमध्ये खासगी क्षेत्रातील कंपनीच्या प्रतिनियुक्तीवरही काम केले आहे. जून 2014 मध्ये दास यांची केंद्रीय महसूल सचिवपदी नियुक्ती करण्यात आली.

No comments:

Post a Comment