कॉंग्रेसमुक्त भारताचे स्वप्न पाहणाऱ्या भाजपाला चपराक-खा.राजीव सातव

Wednesday, December 12, 2018


हिंगोली/प्रतिनिधी
राजस्थान, छत्तीसगड व मध्यप्रदेशात कॉंग्रेसने चांगलीच मुसंडी मारली आहे. कॉंग्रेसमुक्त भारताचे स्वप्न पाहणाऱ्या भाजपाचा या निकालाच्या माध्यमातून मतदारांनी दिलेली चपराक आहे अशी प्रतिक्रिया कॉंग्रेसचे गुजरात राज्याचे प्रभारी तथा हिंगोलीचे खासदार राजीव सातव यांनी व्यक्त केली आहे.

खासदार सातव पुढे म्हणाले, केंद्रातील सरकारने मागील साडेचार वर्षात केवळ जनतेला आश्वासने दिली आहे. सत्तेवर येण्यापुर्वी निवडणुकीच्या वेळी दिलेल्या आश्वासनाचा या सरकारला विसर पडला होता. केंद्रातील सरकार सर्वच आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरले आहे. विधानसभा निवडणुकीतुन जनतेने राफेल घोटाळ्याबद्दलचा संताप मतपेटीतुन दाखवुन दिला तसेच शेतकरी विरोधी धोरणे या सरकारने राबवली आहेत. जनतेच्या मनात सरकार विरुध्द असंतोष निर्माण होत असतांनाही दुसरीकडे भाजपा सरकार मात्र कॉंग्रेसमुक्त भारताचे स्वप्न पाहात होता. मात्र त्यांच्या भ्रमाचा भोपळा या निवडणुकीने फोडला आहे.

खासदार राहूल गांधी यांनी पक्षाची सुत्रे हाती घेतल्यानंतर निवडणुकीसाठी अवलंबलेली रणनिती तसेच काम करणाऱ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना दिलेली संधी यामुळे हे यश मिळाले आहे. आगामी निवडणुकीत कॉंग्रेस व मित्र पक्ष एकत्रीतपणे पुर्ण ताकदीनिशी मैदानात उतरणार आहे. सन 2019 मधे कॉंग्रेस व मित्र पक्षाचेच सरकार स्थापन होणार आहे ,असेही खासदार सातव यांनी सांगितले. आगामी लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसलाच बहुमत मिळेल असे सांगून खासदार सातव म्हणाले, आगामी निवडणुकीची सेमीफायनल समजल्या जाणाऱ्या मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान या राज्यात कॉंग्रेसला मिळालेले यश कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राहूल गांधी यांच्यावर जनतेने टाकलेला विश्वास आहे.

No comments:

Post a Comment