फडणवीसांनी केला नवा विक्रम

Tuesday, December 4, 2018


मुंबई :सर्व विरोधी पक्ष आणि स्वपक्षातील नेत्याना पुरून उरलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आणखी एक विक्रम केला. प्रत्येकाला मागे टाकण्याच्या ध्यासाने कार्यमग्न असलेल्या देवेंद्र यांनी सलग कार्यकाळाच्या बाबतीत दिग्गज नेते तथा दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेले विलासराव देशमुख यांना मागे टाकले .मुख्यमंत्री झाल्यानंतर हे आता किती दिवस राहणार अशा चर्चा होत असताना एकामागे एक चार वर्ष त्यानी केंव्हा पूर्ण केली कोणाला कळलेही नाही. केवळ कार्यकाळ पूर्ण केला नाही तर मिळालेल्या संधीचा फायदा घेत विरोधकांना नामोहरम करण्यात त्यानी यश मिळवले .

सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पद सलग भुषविण्याचा विक्रम वसंतराव नाईक यांच्या नावे आहे .त्यानंतर विलासराव देशमुख यांचा दुसरा क्रमांक होता .पण आता देवेंद्र फडणवीस यानी तो क्रमांक पटकावलाय .
वसंतराव नाईक हे ११ वर्ष २ महिने १५ दिवस सलग मुख्यमंत्री होते .५ डिसेंबर १९६३ पासुन २० फेब्रूवारी १९७२ पर्यंत ते या पदावर होते. विलासरावानी ४ वर्ष १महिना ३दिवस सलग राज्याचे प्रमुख पद भुषविले. देवेंद्र फडणवीस यानी हा विक्रम मोडताना आज ४वर्ष १ महिना आणि ४ दिवस पूर्ण केले .३१ ऑक्टोबर २०१४ पासुन आजपर्यंत ते मुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत .विलासराव देशमुख १८ ऑक्टोबर १९९९ रोजी पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले होते. त्यांची पहिली कारकीर्द ११८७ दिवसांची होती .१६ जानेवारी २००३ पर्यंत ते या पदावर कायम होते .१ नोव्हेंबर २००४ रोजी ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले .यावेळी त्याना १४९४ दिवस मिळाले .आज फडणवीस यानी १४९५ दिवस पूर्ण करत त्याना मागे सारले .

शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री झाले .त्यांचा एकुण कार्यकाळ २४१३ दिवसांचा राहिला .पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे ९३३ दिवस पदावर होते .सर्वात कमी कालावधीचा विक्रम पी के सावंत यांच्या नावावर असुन हंगामी मुख्यमंत्री म्हणून त्यानी २५ नोव्हेंबर ते ४डिसेंबर १९६३ असे फक्त दहा दिवस काम केले. त्यानंतर नारायण राणे यानी २५९ दिवस तर शिवाजीराव पाटील निलंगेकर यानी २७७ दिवस मुख्यमंत्री पद भुषवले .

पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण हे एक ९३३ दिवस (१ मे १९६२ ते १९ नोव्हेंबर १९६२) कार्यरत होते. इतर मुख्यमंत्र्यांचा कालावधी पुढीलप्रमाणे

  • मारोतराव कन्नमवार- ३७० दिवस
  • शंकरराव चव्हाण (दोन टर्म १६५३ दिवस)
  • वसंतदादा पाटील (दोन टर्म-१२७८ दिवस)
  • शरद पवार (चार टर्म २४१३ दिवस)
  • ए. आऱ. अंतुले- (५८३ दिवस)
  • बाबासाहेब भोसले (३७७ दिवस)
  • शिवाजीराव पाटील निलंगेकर (२७७ दिवस)
  • सुधाकरराव नाईक- (६०८ दिवस)
  • मनोहर जोशी (१४१९ दिवस)
  • नारायण राणे (२५९ दिवस)
  • विलासराव देशमुख (दोन टर्म २६८१ दिवस)
  • सुशीलकुमार शिंदे (६५१ दिवस)
  • अशोक चव्हाण (दोन टर्म ६७९ दिवस)
  • पृथ्वीराज चव्हाण (१४१५ दिवस)

No comments:

Post a Comment