शिवसेना जिल्हा प्रमुखावर अट्रासिटी चा गुन्हा दाखल

Wednesday, December 5, 2018


हिंगोली / प्रतिनिधी
औंढा तहसीलवर काढण्यात आलेल्या मोर्चेकऱ्यांना संबोधीत करताना कळमनुरी विधानसभा मतदार संघाचे काँग्रेसचे आमदार डॉ.संतोष टारफे यांच्याबद्दल हिंगोली शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष बांगर यांनी अपशब्द काढले. हा प्रकार त्यांना अंगलट आला असून, काँग्रेसने पदाधिकाऱ्यांनी अशा त्यांच्या अपशब्दावर रोष व्यक्त करत पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेत मंगळवारी (दि.४) औंढा पोलीस ठाण्यात जावून सायंकाळी अट्रासिटी चा गुन्हा दाखल केला.

शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली गेल्या तीन दिवसांपुर्वीच औंढा तहसीलवर मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चेकऱ्यांसमोर बोलताना जिल्हा प्रमुख यांनी काँग्रेस आमदार डॉ.संतोष टारफे यांच्याबद्दल अपशब्द वापरले. अत्यंत खालच्या स्तराची भाषा वापरत जातीवाचक देखील बोलून मोर्चेकऱ्यांची वावहा मिळविली. पण, लागलीच दुसऱ्या दिवशी त्या वक्तव्याचे पडसाद काँग्रेस गोटात उमटले. सोशल मिडियावरून शिवसेना जिल्हा प्रमुखाच्या वक्तव्याची क्लीप सर्वत्र व्हायरल झाली. अशा क्लीपवरून काँग्रेसमध्येच नव्हेतर काही सामाजिक संघटनेतही निषेध होत गेला. मंगळवारी काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक हिंगोली यांची भेट घेवून शिवसेना जिल्हा प्रमुखावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

अशा मागणीनंतर आ.डॉ.संतोष टारफे व त्यांच्या काही समर्थकांनी औंढा पोलीस स्टेशन गाठले. मंगळवारी सायंकाळी ४.३० वाजता आ.डॉ.संतोष कौतिका टारफे यांनी औंढा पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हा प्रमुख संतोष लक्ष्मणराव बांगर यांच्यावर कलम २९४, ४९९, ५०० तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम १९८९ सुधारित २०१५ अन्वये कलम ३ (१) (आर) भादंवी अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. एवढेच नव्हे याच वक्तव्याचा निषेध म्हणून बुधवारी (दि.५) जिल्हा कचेरीवर आ.टारफेंवर अपशब्द काढल्यावरून शिवसेना जिल्हा प्रमखाच्या अटकेची मागणी करण्यासाठी मोर्चा काढला जाणार आहे. त्यांच्या संपतीची चौकशी करून तात्काळ अटक करावी, अशी मागणी मोर्चेकरी करणार आहेत. मोर्चासंदर्भात तसेच गुन्हा दाखल केल्याची माहिती देण्यासाठी सायंकाळी ६ वाजता हिंगोली शासकीय विश्रामगृहात आ.टारफे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजनही केले होते.

No comments:

Post a Comment