हिंगोलीत ५० हजार रुपये आणण्याच्या मागणीसाठी विवाहितेचा खून

Thursday, December 20, 2018
हिंगोली : वाहन घेण्यासाठी माहेराहून ५० हजार रुपये आणण्याच्या मागणीसाठी काठ्या आणि दगडांनी ठेचून विवाहितेचा निर्घृण खून केल्याची घटना सेनगाव तालुक्यातील उमरदरी येथे घडली. याबाबत औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. 


औंढा नागनाथ ठाण्याचे पोलिस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, औंढा नागनाथ पोलिसांनी उमरदरी ता. सेनगाव येथील मीनाक्षी विकास पोले (२५) या महिलेच्या खून केल्याप्रकरणी पती विकास याच्यासह सासरा शामराव पोले, सासू शांताबाई, दीर बंडू, जाऊ बालाबाई यांच्यावर भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२, ४९८, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सदर प्रकरणामध्ये सासरच्या मंडळींकडून मीनाक्षी हिला वाहन घेण्यासाठी माहेराहून ५० हजार रुपये आणण्यासाठी तिचा पती विकास व सासू सासरे व इतर नातेवाइक तगादा लावत होते. सहा महिन्यांपूर्वी नातेवाइकांनी बैठक घेऊन दोन्ही बाजूंमध्ये समेट घडवून आणली होती. तरीही ५० हजार रुपये देण्याच्या मागणीवर सासरची मंडळी ठाम राहिली. 

त्यांनी मंगळवारी सायंकाळी मीनाक्षी हिला आपल्या शेतात नेऊन काठीने बेदम मारहाण करून आणि दगडाने ठेचून तिचा खून केला. तिला दगडाने ठेचून काढण्यापूर्वी तिचा गळा आवळण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. मीनाक्षी मृत झाल्यानंतरही नातेवाइकांनी तिचा चेहरा दगडाने ठेचला. या घटनेमुळे संताप व्यक्त होत असून औंढा नागनाथ पोलिसांनी मुख्य आरोपी शामराव पोले याला अटक केली

No comments:

Post a Comment