बीड मध्ये सैराट, मेहुण्याने भररस्त्यात दाजीची केली हत्या !

Thursday, December 20, 2018

बीड :-  बीडच्या गांधीनगर परिसरामध्ये भावानेच मित्रांच्या मदतीने बहिणीच्या नवऱ्याची धारधार शस्त्राने वार करू हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली असून मृत तरुणाचे नाव सुमीत वाघमारे (25 रा.तालखेड ता. माजलगाव ह.मु. नागोबा गल्ली, बीड) असून तो आदित्य इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षात शिकत होता. 

सायंकाळी पाचच्या सुमारास परीक्षा देऊन परत असताना सुमीतवर पत्नी भावाने मित्रांसह धारधार शस्त्राने हल्ला केला. कॉलेजपासून जवळच हा प्रकार घडला. या हल्ल्यात सुमीत जागीत गतप्राण झाला, तर त्याची पत्नी जखमी झाली. हल्ला झाल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सुमीतच्या मदतीसाठी ती याचना करत होती. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सुमीत आणि ती एकाच कॉलेजमध्ये एकाच वर्गात शिक्षण घेत होते. याच दरम्यान दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले आणि दोघांनीही आयुष्यभर सोबत राहण्याचा निर्णय घेतला. दोन महिन्यांपूर्वी दोघांनी प्रेमविवाह केला परंतु या विवाहाला तिच्या घरच्यांचा विरोध होता. यावरून तिचा भाऊ बालाजी लांडगे याचे सुमीतसोबत जोरदार भांडणही झाले. याच रागातून त्याने बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास त्याच्यावर हल्ला करत खून केला. हल्ल्यानंतर आरोपी फरार झाला आहे.

No comments:

Post a Comment