सौ.सुमन उमरीकर यांचे निधन

Friday, December 21, 2018


नांदेड/प्रतिनिधी

येथील रहिवासी तथा सेवानिवृत्त शिक्षिका सौ. सुमन दामोदर उमरीकर (_वय ७७) यांचे ऱ्ह्दयविकाराने २० डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजता खाजगी रुग्णालयात निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा राहते घर 'दासू निवास' येथून गुरुवारी रात्री काढण्यात आली.

 गोवर्धनघाट येथील शांतीधाम स्मशानभूमीत त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. सौ. सुमन उमरीकर यांनी मरणोत्तर नेत्रदान केले. शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य केलेले आहे. ३२ वर्ष त्यांनी विद्यार्थी घडविण्याचे कार्य मोठ्या सेवाभावाने केले. नांदेड, कुष्ठधाम नेरली, उमरी, इतवारा येथे त्यांनी शिक्षिका म्हणून सेवा दिली. त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, सुना, मुलगी, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. पुण्यनगरीचे ज्येष्ठ उपसंपादक कृष्णा उमरीकर यांच्या त्या मातोश्री होत.

No comments:

Post a Comment