पद्मविभूषण खा.शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मराठा जात प्रमाणपत्र प्रस्ताव संकलन शिबीराला मुदतवाढ

Friday, December 21, 2018


परळी वैजनाथ।प्रतिनिधी..
देशाचे माजी कृषीमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली परळीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने १२ ते २० डिसेंबर या कालावधीत मराठा जात प्रमाणपत्र प्रस्ताव संकलन शिबीर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. लोकाग्रहास्तव या शिबीराला मुदतवाढ देण्यात आली असून हे शिबीर ३० डिसेंबर पर्यंत चालणार आहे. 
 
लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदीर प्रांगणात १२ ते २० डिसेंबर मराठा जात प्रमाणपत्र प्रस्ताव संकलन शिबीर शिबीर ठेवण्यात आले होते. या मध्ये मराठा समाज बांधवांना जात प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने मोफत तयार करून त्याचे संकलन करण्यात येत आहे.प्रमाणपत्र मिळण्यासाठी हे प्रस्ताव संबंधित प्रशासकीय यंत्रणेला सादर करण्यात येणार आहेत. या शिबीराला मराठा समाजबांधवांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. हे शिबीर आणखी काही दिवस सुरू ठेवावे अशी आग्रही मागणी झाल्याने हे शिबीर दि. ३० डिसेंबर पर्यंत सुरू राहणार आहे. 
 
नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी, सरचिटणीस अनंत इंगळे व सर्व पदाधिकारी, सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस परळी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

मराठा जात प्रमाणपत्र प्रस्ताव संकलन शिबीराचा लाभ घ्यावा.

आरक्षणाचा लाभ घेता यावा यासाठी आवश्यक असणारे जात प्रमाणपत्र लवकरात लवकर प्रत्येक मराठा समाजबांधवांना मिळावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ३० डिसेंबर पर्यंत मराठा जात प्रमाणपत्र प्रस्ताव संकलन शिबीरआयोजित केले आहे.याचा लाभ घ्यावा व अधिक माहितीसाठी विजय भोयटे ९८९०६८५७८७, संतोष शिंदे ९४०५५८५५५, प्रा.शंकर कापसे ९४०४२७७७७१,शरद चव्हाण ९०२८९९४७२७, दिनेश गजमल ८०८७१७७१११, दत्ता मोरे 9850688585 नितीन निर्मळ,सुरेश नानावटे, श्रीकांत माने ९४२२४१६२२२ यांच्याशी संपर्क साधावाअसे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment