जय महेश कारखान्याने व्याजासह २०५० रुपये द्यावेत -पुजाताई मोरे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

Friday, December 21, 2018


बीड : मजालगाव तालुक्यातील जय महेश साखर कारखान्याकडे उसाचे पैसे देताना सुरुवातीला काही शेतकऱ्यांना २०५० रुपये प्रति टन प्रमाणे देयके अदा केली होती. मात्र त्यानंतर अनेक शेतकऱ्यांची उसाची देयके १८०० रुपये प्रति टन प्रमाणे देण्यात आली होती, त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले असून कारखान्याने शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे. असा आरोप करत व्याजासह देयके देण्याच्या मागणीसाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.


जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे त्यामुळे शेतीवर आधारीत असणाऱ्या मजूर व शेतकऱ्यांचे आर्थिक गणीत बिघडले आहे. तसेच मागील वर्षी पावसाचे प्रमाण चांगले असल्यामुळे माजलगाव, गेवराई, बीड, यासह इतर सर्व तालुक्यात उसाचे क्षेत्र वाढले होते. ते पुर्णपणे गाळप देखील करण्यात आले होते. मात्र गाळप केलेल्या उसाची देयके जय महेश साखर कारखान्याकडून काही शेतकºयांना २०५० रुपये प्रमाणे दिले होते. तर काही शेतकऱ्यांना १८०० प्रमाणे दिले होते.

 त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना वढीव भाव दिला नाही, त्यांना तात्काळ पैसे देण्यात यावे या मागणीसाठी मागील ११ महिन्यापासून शेतकरी आंदोलन करत आहेत. मात्र कारखान्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नाही. साखर कायदा १९६६ नुसार कारखान्याचा गाळप झाल्यापासून १५ दिवसांनी शेतकऱ्यांना पैसे देणे अनिवार्य आहे. हा कायदा मोडीत काढत कारखानदारांनी जवळपास वर्षभरापासून शेतकऱ्यांचे पैसे थकवलेले आहेत. त्यामुळे काराखान्याने कायद्याप्रमाणे उर्वरीत २५० रुपये प्रति टन प्रमाणे पैसे खात्यावर व्याजासह जमा कारवेत. अन्यथा स्वाभिामानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाभरात तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवती प्रदेशाध्यक्षा तथा पं.स.सदस्य पुजा मोरे, पक्षाचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे, युवा जिल्हाध्यक्ष राजु गायके पाटील, राजेंद्र होके पाटील, वचिष्ट बेडके, राहुल चिरके, रोहिदास चव्हाण, अर्जुन सोनवणे, प्रदीप सोळुंके, अनिल रांजवन, अशोक वाघमारे, अशोक गित्ते, राजाभाऊ देशमुख, अंगद फलके, दिनेश रिंगणे, बळीराम शिंदे, संभाजी सौंदर, बाळासाहेब मोरे, लक्ष्मण धुमक यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा सहभाग आंदोलनामध्ये होता.

No comments:

Post a Comment