विशेष प्रतिनिधी
नांदेड- लोह्याच्या जनतेनी इतिहास घडविला लोह्यात कमळ फुलविले त्याची दखल थेट राज्याच्या राजधानीत घेण्यात आली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आ. प्रतापराव पाटील यांचे अभिनंदन केले. नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांना मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या व लोह्याला येण्याचे मान्य केले. शहरासाठी कायमस्वरूपी पाणी पुरवठा व शहर विकासासाठी निधी देण्याच्या मागणीवर तात्काळ कार्यवाही करा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिल्यामुळे शहरवासियांच्या अपेक्षापूर्ती होणार असे चित्र निर्माण झाले आहे.
गेल्या आठवडयात लोह्यात आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपा’ने ऐतिहासिक विजय मिळविला. गुरुवारी दुपारी चार वाजता सहयाद्री अतिथीग्रह येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आ. प्रतापराव पाटील व नवनिर्वाचित नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी व नवनिर्वाचित नगरसेवकांशी जवळपास पंचवीस मिनिटे सविस्तर चर्चा केली. शहर व मतदार संघाच्या विविध विकास कामांचे निवेदन दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यावर तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधितांना दिले.
लोहा शहराच्या लिंबोटीवरून कायमस्वरूपी पाणी पुरवठा योजना मार्गी लागली. दलित वस्ती, दलितेतर विकास, रस्ते तसेच शहरातील अन्य महत्त्वाच्या विकासासाठी निधीची मागणी करण्यात आली. ते देण्याचे मुख्यमंत्र्यांनी मान्य केले.
लोहा वासियांनी आ. प्रतापराव पाटील यांच्या नेतृत्वावर जो विश्वास टाकला तो सार्थ ठरल्याचे संकेत मिळाले. कंधार वासियांना मात्र पश्चाताप होत असावा. लोह्याला मुख्यमंत्री लवकरच येण्याचे मान्य केले. नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी व नगरसेवकांना मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या.
नगरसेवक केशवराव मुकदम,शरद पवार, करीम शेख, नामदेव पाटील पवार, कृष्णा पापीनवार, भास्कर पवार, अरुण येळगे, दता वाले, नारायण यलरवाड, संदीप दमकोंडवार, खंडू पवार, गणेश बगाडे, सचिन रहाटकर, अमोल व्यवहारे,बंडू वडजे , गुलाम शेख, स्वीय सहाय्यक संदीप वाघ, सचिन बेंद्रीकर, माजी जि.प. सदस्य रावसाहेब पाटील हळदेकर यांच्यासह लोह्याचे कार्यकर्ते उपस्थितीत होते.
अविस्मरणीय‘ सह्याद्री’
आणि सुखद धक्काच!
लोह्यातील सर्व सामान्य कार्यकर्ता मुंबईला सह्याद्री’ या अतिथीगृहात जाणार नाही...काम काही नसते तसे त्यांनी कधीच स्वप्न पाहिले नसावे.... परंतु आ. प्रतापराव पाटील चिखलीकर हे कार्यकर्त्यांना मान सन्मान’ देणारे नेतृत्व.. आहे. लोह्यातील सर्वसंामान्य कार्यकर्ते मुंबईत गेले थेट मुख्यमंत्र्यांशी बोलले... सह्याद्री’त विसावले... हे सर्व अविस्मरणीय होते .. नामदेव पाटील, गुलाम शेख यांसह कार्यकर्त्यांनी हा क्षण सुखद धक्का देणारा होता असे आवर्जून सांगितले

No comments:
Post a Comment