मनपा प्रशासनाने पाणीपट्टी च्या नावाखाली लातूरकराची दिशाभुल करु नये

Wednesday, December 5, 2018

लातुर  महानगरपालिका प्रशासनाने पाणीपट्टीच्या नावाखाली लातूरकाराची दिशाभूल करु नये आम्ही लातूरकर युवक कृती समितीचे प्रसिद्ध पत्रक निवेदनात लातूर शहरवासीयाना पाणीपुरवठा करणाऱ्या माजरा धरण क्षेत्रात सन २०१३ते२०१५ या सलग तीन वर्ष अत्यल्प पाऊस झाल्याने सन २०१५-१६ व २०१६-१७ या वर्षात लातूर शहरातील नागरिकाना तीव्र पाणिटचाईस तोड़ द्यावे लागले.

पाणी पाणी म्हणता पाण्याने लातूरकराच्या डोळ्यात पाणी आणले तर दुसरीकडे मार्च २०१५ पर्यंत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण लातुर कार्यालयाने पाणीपट्टी वसुली केलेली आहे या परिस्थिती बाबत महानगरपालिका प्रशासन अवगत आहेच म्हणून लातूर शहर महानगरपालिका लातूर,सर्वसाधारण सभा दि.२०.७.२०१७ रोजी विषय क्र.३,ठराव क्र.७ वर चर्चा होवून टचाई काळातील पाणीपट्टी माफ़ करणेसाठी शासनास शिफ़ारस करण्यास मान्यता देण्यात येत आहें मा आयुक्त यानी याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर क़रावा असा ठराव पारित केलेला आहे, असे असताना ही लातूर शहर महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाच्या वतीने पाण्याचे थकीत देयकात एम जी पी ने मार्च २०१५ च्या पूर्वी वसुल केलेल्या पाण्याचे देयकासह, (२०१५-१६,२०१६-१७ सह)पत्रक देऊन पाण्याचीं देयके(पाणीपट्टी)भरण्याचीं अंतिम तारीख़ ३१ डिसेबर २०१८ पूर्वी भरण्याचीं सकती केली जात आहे जी अयोग्य व लातूरकराची दिशाभुल करणारी आहे ठरावा प्रमाणे सन २०१५-१६,२०१६-१७ या पाणी टचाई काळातील व मार्च २०१५ पूर्वी एम जी पी ने वसूल केलेली पाणीपट्टी माफ़ करुन लातूरकराना दिलासा देण्याचीं मागणी शिष्ट मंड़ळाद्वारे दि.१७. ०२.२०१८ रोजी मा महापौर, श्री कांबळे सहाय्यक आयुक्त, मनपा लातुर यांना अड़ प्रदीपसिंह गंगणे,बसव सेवा संघाचे बालाजी पिपळे,साईनाथ घोणे,सर प्रतिष्ठानचे अड अजित चिखलिकर,ताहेरभाई सौदागर,माजी सभापती अज़ीज़ बाग़वान,श्रीनिवास राजनकर,बालाजी रत्नपारखे,राजु बुये,दिनेश डोईजोड,निखिल शिंदे,दिग़ाबर कांबळे,जमाल्लोद्दींन मणियार,विलास सरडे, गीतेश राजनकर,मीर इरफ़ान अली,परमेश्वर मदने आदीनी केली होती लोकप्रतिनिधीना,प्रशासनास लातूरकराची काळजी नाही हे स्पष्ट होते म्हणूनच फक्त ऐनकेन प्रकारे पाणीपट्टी वसुल करण्यासाठी दिशाभुल करीत आहेत, असे समितीचे म्हणने आहे

No comments:

Post a Comment