डॉ. आंबेडकर प्रतिमेसमोरील अतिक्रमण हटविण्याची मागणी

Wednesday, December 5, 2018

आखाडा बाळापूर / प्रतिनिधी
कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शेवाळानजीक असलेल्या प्रतिमेसमोरील लावण्यात आलेली राज्यस्तरीय उपवर-उपवधू परिचयाचे बॅनर व इतर अतिक्रमण तात्काळ हटवावे अशी मागणी भारिप बहूजन महासंघाच्यावतीने ग्रामपंचायतीकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 6 डिसेंबर रोजी संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्माण दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात येतो. त्यामुळे येथे लावण्यात आलेले बॅनर काढून अतिक्रमण हटवावे अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर माणिक पंडीत, आनंद पंडीत, किरण इंगोले, विजय खिल्‍लारे, विक्‍की पंडीत, आकाश पंडीत, सुमेध ढगे, सुमित पंडीत, ओमप्रकाश पंडीत आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

No comments:

Post a Comment