कळमनुरी / प्रतिनिधी
महायुतीच्या 2014 मधील निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये धनगर समाजास अनुसूचीत जमातीच्या सवलती लागू करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु शासनाने धनगर समाजाची साडेचार वर्षात फसवणूक केल्याच्या निषेधार्थ सोमवारी (दि.3) महायुतीचा जाहीरनामा जाळला. यावेळी मोठ्या संख्येने धनगर समाज बांधव उपस्थित होते.
धनगर समाजाच्यावतीने सोमवारी तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देवून धनगर समाजास तात्काळ अनुसूचीत जमातीच्या सवलती द्याव्यात अशी मागणी केली. तसेच जगजेता चक्रवर्ती राजा यशवंतराव होळकर यांच्या जयंतीदिनी तहासील कार्यालयासमोर महायुतीचा 2014 मधील जाहीरनामा जाळून संताप व्यक्त करण्यात आला. समाजाच्या तीव्र भावनाचा आदर करून धनगर समाजास अनुसूचीत जमातीच्या सवलती द्याव्यात अशी मागणीही यावेळी करण्यात आली. यावेळी अॅड.के.के.शिंदे, अशोक ढेंगल, प्रकाश नाईक, खंडबाराव नाईक, दिनकर कोकरे, केशवराव मस्के, डॉ.प्रकाश नाईक, बाळासाहेब कायकोळे, बळीराम व्हडगीर, सुरेश मस्के, रामराव मस्के, गंगाराम वैद्य, सुभाष कोकरे, माधवराव हराळ, रामदास शिंदे, नानाराव शिंदे, अशोक मस्के यांच्यासह तालुक्यातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थिती होते.
No comments:
Post a Comment