आप्पाबाबा यांची दै.मराठवाडा नेताच्यावतीने वृत्तसंपादक सत्यजीत बद्दर यांनी मुलाखत घेतली ती वाचकांच्या माहितीस्तव आम्ही प्रकाशीत करत आहोत.- संपादक
प.पू. आप्पाबाबा यांना विचारण्यात आले की, आपण आपल्या कामासंदर्भात, सेवेसंदर्भात काय सांगू इच्छितात?
या संदर्भात आम्ही काय सांगणार, आमच्या कामाचं मूल्यमापन समाजाने करायला हवं, समाजानं ठरावायला हवं, आम्ही काय करीत आहोत, आमची लायकी काय आहे. असं सांगून आप्पाबाबा म्हणाले, जस आपण खात असतांना चांगल-चांगलं बघून खातो तस समाजातील सर्व स्तरातील लोकांनी आपले मत बनवत असतांना चांगल-चांगल ते घ्यायला हवं. विकृती निर्माण होता कामा नये, यासाठी चिंतन व मनन करून चांगल्या गोष्टीचा स्वीकार करायला हवा.
आपल्या जवळ-जवळ 35-40 वर्षाच्या कार्याबद्दल आपल्याला काय वाटतं?
याच उत्तर देत असतांना प.पू. आप्पाबाबा म्हणतात, या संदर्भात लोकांची मानसिकता महत्वाची आहे. लोक हे रत्नपारखी आहेत. लोक बर्याचवेळा सत्य स्वीकारला घाबरतात, पण सत्य हे सत्य असतं आणि सत्याचा विजय होत असतो. या ठिकाणी जनता फार जागरूक आहे, असेही आप्पाबाबा म्हणाले.
भारत देशाच्या भविष्याविषयी
आपणास काय वाटतं?
हे विचारला असता आप्पाबाबा म्हणतात, या देशातील सुज्जान नागरिकांनी कर्तव्य पार पाडायला हवेत. आपले कार्य करायला हवं आणि देशाचा विचार करायला हवा, असेही मत आप्पाबाबा यांनी मांडले.
दिवसेंदिवस जातीय वाद वाढत आहे?
असा प्रश्न केला असता आप्पाबाबा म्हणाले, जातीयवादात लोक अडकत नाहीत. स्वार्थी माणसं स्वार्थासाठी प्रकर्षाने आपल्या पोळीवर तूप ओढून घेण्यासाठी चुकीचा प्रयत्न करतात. पण ते कुठल्याही किंमतीवर यशस्वी होवू शकत नाही आणि समाजाचा वापर करण्याचा जर कोणी प्रयत्न करीत असेल. तर येथे स्वार्थी लोकं तांदळातील खड्यासारखे बाजूला फेकले जातील. असे सांगून आप्पाबाबा म्हणाले, विकासाला स्वार्थी पुढारी रोखू शकणार नाहीत. त्या पद्धतीने गाढवाला वाघाचे कातडे पांघरावल्याने तो वाघ होवू शकत नाही, असे सांगून राष्ट्रीय विकासत्मता व देश एकसंघ राहण गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.
आपण घरा-घरापर्यंत काय सांगू इच्छिता?
या संदर्भात उत्तर देतांना आप्पाबाबा म्हणाले, आज या घडीला संपूर्ण जगाने हिंदू संंस्कृतीचा, परंपरेचा अभ्यास केलेला आहे. आणि जग मोठ्या अपेक्षेने भारताकडे पाहत आहे. आपला धर्म, आपली संस्कृती, आपली परंपरा जतन करायला हवी. हे आपण जर नाही केल, तर येणारी पिढी आपल्याला क्षमा करणार नाही. आपली विरासत, आपला धर्म, आपली संस्कृती, याबद्दल अभिमान बाळगत असतांना डोळसपणाने आपण काम करायला हवं. जग डोळेझाकून आपल्या पाठिशी येईल, समाजातील विकृती ती फार काळ चालू शकत नाही. आज आपली संस्कृती, परंपरा ही फार मौलाची आहे, असेही आप्पाबाबा म्हणाले.
अस विचारला असता, आप्पाबाबा म्हणाले, सीमेवरच्या जवानांना सर्व बाजूने आपण तन-मन-धन आणि वेळप्रसंगी रक्ताने सुद्धा मदत करायला हवी. आपला धर्म, आपली संस्कृती, आपले देश, आपले देव याचे संवर्धन करायला हवं, यासाठी आम्हाला एकसंघ राहवे लागणार आहे. संकुचीत विचाराचा त्याग करावा लागणार आहे. वसु धैव्य कुुटुंब कमम म्हणजे हे जगच माझे कुटुुब आहे, आम्ही शास्त्राचा-पुरणाचा चिंतन आणि मनन करायला हवं, आम्हाला दुसर्या विचाराची गरज नाही. आपले धर्मसाहित्य समृद्ध आहे. आणि आपण उद्या भारताचे भविष्य उज्ज्वल आहे, असेही ते म्हणाले.
प्रसारमाध्यमा संदर्भात आपलं काय मत आहे?
असे विचारले असता, प्रसारमाध्यमांनी एकतर्फी असता कामा नये, अतिशय थोडी प्रसारमाध्यमे हे संतुलीत दृष्टीकोनातून काम करतात. प्रिंटमीडिया, ईलेक्ट्रॉनिक मीडिया यांनी सत्य लोकांसमोर आणायल हवं, यासाठी अंतर्भूत होवून विचार करायला हवां आणि खर्या अर्थाने सत्य हे बाहेर आणायला हवे.
देव-धर्म न राहता तो रस्त्यावर आला पाहिजे, देवाला रस्त्यावर आणावे लागणार आहे. आणि खर्या अर्थाने लोकजागृती करावी लागणार आहे, असे आप्पाबाबा म्हणाले.
धार्मिक क्षेत्रातील व्यापारीकरण होत आहे काय? या संदर्भात आपणाला काय वाटत?
असे विचारले असता, आप्पाबाबा म्हणाले धर्माचे, देवाचं मार्केटिंग करून आपले पोटभर भरण्याचा उद्योग, आपलं मार्केटिंग करण्याचे काम चाललेल आहे. देव, धर्म आणि संस्कृतीचे मार्केटिंग होता कामा नये, आणि खर्या अर्थाने राष्ट्ररक्षण, देवरक्षण, धर्म रक्षणाचे कार्य करायला हवं असेही ते म्हणाले.
गोपालन व शेती संदर्भात आपलं काय मत आहे?
हे विचारला असता, आप्पाबाबा म्हणाले, गोमाता जगली तर देश सुजलाम सुफलाम होईल, शेतीचा विकास होईल, गायीचे शेण आणि गोमुत्र हे शेतीच्या आरोग्यासाठी हितकारक आहे. त्यामुळे आपणास खूप मोठी मदत होणार आहे. आणि गोपालन खूप गरजचे आहे. असे सांगून भारत देश महासत्ता होणारच. यासाठी गरज आहे संकुचित विचाराला थारा न देता, सत्यावर आधारीत देश उभारणी गरजेची आहे. येणार्या काळात भारत विश्वगुरू होणार, त्याचे शिलेदार, शिल्पकार म्हणून आपण काम करायला हवे. हे सांगून समर्पन, शिस्त, परिश्रम, राष्ट्रभक्ती जतण, वृद्धींगत या आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे, असेही आप्पाबाबा म्हणाले.
लोभ वाढल्यानेच पाप आताच्या परिस्थितीत लोक पाप पुण्याचा विचारच करत नाहीत. कारण प्रत्येकाला वाटतं मी करतो ते पुण्याचेच काम आहे. ते बरोबर आहे. स्वतःची कृती बरोबर की चूक हे तपासण्याचे कष्टसुद्धा घ्यायची तयारी नाही. कारण स्वार्थच इतका भरला आहे की त्यामुळे दुसर्याला काय वाटेल ? दुसर्यालाही मन आहे. विचार आहे. त्यांच्याही काही गरजा आहेत. याचा विचार करायला वेळच नाही. मी आणि माझं या पलिकडे कुणी जायलाच तयार नाही.
स्वार्थ, मोह, लोभ वाढल्यानेच माणूस पाप करतो. लोभ हे पापाचे मूळ आहे. संकटांचे मूळ लोभात आहे. लोभातून वैर निर्माण होते. नीती-अनिती काहीच कळत नाही. माणसाला लोभ जडला की तो वाटेल ते पाप करायला तयार होतो. द्रव्याचा, संपत्तीचा, कामिनीचा, धनाचा, सत्तेचा, मद्याचा लोभ हा सर्वनाशास कारणीभूत होतो. लोभातूनच काय, क्रोध, मोह, मद, मत्सर निर्माण होतो. श्री दत्त महाराजांनी या षडरिपूतून सुटण्यासाठी चोवीस गुरु केले. प्रत्येकाकडील चांगले गुण घेतले.
म्हणून मायबापहो ! लोभ केला की संकटे येतात. गळाला लावलेल्या अमिषाचा माशाला लोभ होतो आणि जाळ्यात अडकून तो जीव गमावून बसतो. एखाद्या वस्तूचा लोभ सुटला की माणूस ती प्राप्त करून घेण्यासाठी वाटेल ते करायला लागतो.
याची दुसरी बाजू देखिल समजून घेण्यासारखी आहे. ती गोष्ट कुठली तर मर्यादित लोभ असणे. हे वाईट नाही. परंतु अति लोभ नसावा. लोभच नसेल तर जगणसाठी माणसं धडपडणारच नाहीत. पैशाची गरज जगण्यासाठी आहे. परंतु तो मिळविण्यासाठी कोणताच धंदा करणार नाही. लोभ आहे म्हणून व्यापारी आहेत. व्यापार आहे. उद्योगधंदे आहेत. म्हणून फारच मर्यादित लोभ हा माणसाला प्रगतीकडे घेऊन जातो.
नामस्मरण, भजन, पूजन, अर्चन, कीर्तन, पारायण, नामसंकीर्तन, यांचा लोभ असणे वाईट नाही. त्यामुळे संत संगती, सत्संगती लाभते. चांगले विचार, आचार, सदाचरण यांचा लोभ ठेवा. तुकाराम महाराज म्हणतात. जर तुम्ही लोभ वाढविला तर देवाकडे जाण्यास उशीर होईल. त्यामुळे लोभाला ताब्यात ठेवण्यासाठी त्या भगवंतांचे चरण धरा. कल्याण नक्की आहे.
गुरू हा कामधेनू गाय...
गुरू ब्रम्हा गुरू विष्णू गुरू देवो महेश्वरा
गुरू साक्षांत परब्रम्हा तस्मै श्री गुरूवे नमः।
ब्रम्हानंदम परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ती
द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्व मस्यादिलक्ष्यम्।
एकं नित्यम विमलमचलम सर्वधीसाक्षीभूतं
भावतीतं त्रिगुणरहितं सद्गुरू तं नमामि॥
किती सार्थ आहे नाव आनंद सोहळा. पण जे भक्त गुरूवारी रूईभरला जातात त्यांच्यासाठी तो गुरूवार आनंद सोहळाच असतो.
जन्म, मृत्यू व साक्षात्कारी पुरूषाची भेट या विधीलिखीत घटना आहेत. अप्पाबाबांची भेट ही एक विधीलिखीतच घटना आहे. त्याच बरोबर ती माझ्या जीवनातील अत्यानंदाची पण गोष्ट आहे. तरीपण पात्रता नसताना लिहायचे धाडस करत आहे. प.पू.अप्पाबाबांच्या सान्निध्यात आल्यापासून प्रत्येक भेटीत काहीतरी नवीन शिकायला मिळते. कधी देव, कधी धर्म, कधी कसे जगायचे तर कधी रागावर नियंत्रण कसे करायचे. हे सर्व अगदी सरळ, सोप्या भाषेत, शब्दात, पण त्या शब्दाची किंमत त्यांनाच ज्यांच्याशी ते बोलतात. पण कधी-कधी लेकी बोले सुने लागे या युक्तीप्रमाणे एकाला बोललेले किंवा समजावलेले शब्द दुसर्याच्या प्रश्नावरचे उत्तर सुद्धा असते.
माझ्यासाठी म्हणण्यापेक्षा आम्हा सर्व भक्तासाठी ते अज्ञान नाहीसे करणारे ब्रम्ह, जे अंधाराकडून प्रकाशाकडे नेतात व ज्ञान म्हणजेच आत्मज्ञानाची ओळख करून देतात. जीवनाच्या या प्रवासात कितीतरी अडचणी आल्यातरी बाबा त्या सहजतेने सोडवतात. फक्त श्रद्धा, विश्वास व सबुरी हवी. त्यांचं एक वाक्य मला आठवतं... मी आहेना, मी सर्व पाहून घेईन... वाक्यात किती वजन, किती आधार आणि किती आपलसे असल्याची भवना. हे वाक्य कानावर पडताच वाटतं प्रश्न सुटला व आनंदात आपण निरोप घेतो.
मी तर म्हणेन त्यांच्यामुळेच माणूस म्हणून कसे जगायचे हे आम्ही शिकलो. खूप वेळा वाटतं, बाबाजींचा हात आपल्या डोक्यावर नसता तर काय झाले असते? आपण इतके सुंदर जीवन जगलो असतो काय? पण ते क्षणभरच... सध्यातर मी स्वतः जगातील सर्वात नशीबवान, भाग्यवान समजते, कारण बाबाजी सारखे मार्गदर्शक मिळाले. माझ्या या जन्माचे सार्थक झाले म्हणूनच म्हणते... माझी देवपूजा, पाय तुझे गुरूराया। बाबाजींनी बरीचशी योगशिबीरे घेतली, त्यातील एका शिबीरात अनुभव करण्याचा योग आला. या शिबीरातून त्यांनी योगाचे शिक्षण दिले, शरीराची काळजी कशी घ्यावी? हे तर शिकवलेच. पण याचबरोबर मनाची काळजी कशी घ्यावी, दुसर्यांच्या मनाचा आदर कसा करावा व प्रचंड आध्यात्मिक ज्ञान. प्रत्येक प्राणीमात्रात देव पहा, त्यांची पूजा करा, भक्ती करा, चिंतन करा, नामस्मरण करा, म्हणजे आनंद, परमानंद मिळेल, त्यांचं म्हणणं एकच...
जेवढं शिकवता येईल तेवढं शिकवेन,
जितके तुम्हाला देता येईल तेवढे देईन,
त्यामुळेच तुमचे आयुष्य सुंदर बनेल.
या जीवनाच्या प्रवासात बाबा आम्ळा सगळ्यांची इतकी काळजी घेतात, ते शब्दात व्यक्त करता येत नाही. त्यासाठी अनुभवच घ्यावा लागतो. अशा या आधारवडाला मी नमन करते आणि त्यांनी शतायुषी व्हावे असे देवाजवळ मागणं मागते. तेही आमच्या सारख्याच्या कल्याणासाठीच...
सौ.सुमित्रा रमाकांत धारूरकर (धाराशिव)
प.पू. आप्पाबाबा : एक शक्तीकेंद्र

No comments:
Post a Comment