मराठवाडा ही संताची भूमी उस्मानाबाद उजनी रस्त्यावर रूईभर हे एक तीर्थक्षेत्र गेल्या 30-35 वर्षात विविध अनुभवातून चर्चेले जात आहे. प.पू. दत्तस्वरूप आप्पाबाबा हे एक व्यक्ती नाहीत तर एक ऊर्जाकेंद्र आहे. एक शक्तीकेंद्र आहे, असे अनुभवायला येते.
प.पू. आप्पाबाबा एक सकारात्मक विचार देणारे व दुसर्या बाजूस अंधश्रद्धेला मुठमाती देवून सकारात्मक विचारातून समाजहिताचे, विश्वकल्याणाचे कार्य करतांना दिसतात. दुर्दैवाने समाजामध्ये धर्मकारणाचा बाजार बनत चालला आहे. आणि परिस्थितीमध्ये खरा तो एकची धर्म जगाला पेे्रम आरपावे या ओळी प्रमाणे आप्पाबाबांचे कार्य मराठवाडा, महाराष्ट्र, आंध्र, कनार्टक, गुजरातही नाही तर देशाच्या बाहेर 16-17 राष्ट्रात त्यांचे भक्त आहेत. ते कधीही जाती-पातीचा विचार करीत नाहीत. गरीब-श्रीमंताचा विचार करीत नाहीत. अत्यंत साधी राहणी आणि देश, देव व धर्म रक्षणासाठी करत असलेले प्रयत्न जर पाहिले तर आपला आपल्यावर विश्वास बसत नाही. असे अतुलनीय अद्भूत कार्य त्यांनी उभे केले आहे. मूळात बरेच संत ते जातीचे, श्रीमंताचे दिसतात. पण दत्तस्वरूप आप्पाबाबा यांचे कार्य रूईभर तीर्थक्षेत्राचा झालेला विकास त्याठिकाणी उभारण्यात आलेले चार मजली यात्री निवास, त्या ठिकाणचे अन्नछत्र, भव्य सभामंडळ हे कार्य कधीही कोणासही कसलाही निधी न मागता जे चालू आहे. हे एका शक्तीकेंद्रसारखे आहे. ज्या पद्धतीेने सुर्य प्रकाश देते, त्यामुळे सौर ऊर्जा तयार होते.
सूर्यामुळे पिके वाढतात. या सर्व गोष्टीचा विचार करत असतांना रूईभर येथे हजारो भाविकभक्त तर गुरुवारी येथे येतात. दत्तजयंतीचा उत्सव, या ठिकाणी चालणारे अन्नदान व विविध समस्याग्रस्त यांना खणवण्याचे कार्य कसे घडते. हे सुद्धा अनाकलनीय आहे. वयोवृद्ध व्यक्तीची जेवढी काळजी तेवढीच तरूणांची काळजी आप्पाबाबा घेतांना दिसतात. आपल्याकडे एकवेळा आलेला व्यक्ती 20-25 वर्षानंतर जरी भेटला जरी त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी व ओळख आप्पाबाबा ठेवतात. अनेक वेळा विविध प्रश्नासंदर्भात त्यांचे मत ऐकल्यानंतर ते मानसशास्त्रज्ञ ते अर्थशास्त्र, समाजशास्त्रज्ञ, डॉक्टर, विचारवंत आहेत, ते एक धर्मशास्त्राचे गाढे अभ्यासक आहेत असे आपणाला अनुभवाला येते. आज भारतमातेचा, राष्ट्रीय एकात्मतेचा विचार करीत असतांना, राजकीय मंडळीपासून अलिप्त राहून परस्परांना समन्वयानातून ऊर्जा देण्याचे कार्य आप्पाबाबा करतात.
त्यांच्या दैनंदिन कार्यपद्धतीचा विचार करीत असतांना औंढबर नाही, बडेजावपणा नाही, आणि हे सर्व करीत असतांना असाध्य आणि जरजर रोगावर सुद्धा ते उपाय करतांना दिसतात. समोर बसलेला व्यक्ती व त्याच्या मनातील विचार अनेकदा अप्रत्यक्षरीत्या बोलून जातात. असे हे एक शक्तीकेंद्र आहे. या शक्तीकेंद्राचा वापर गावच्या व्यक्तीच्या, समााजच्या आणि देशाच्या हितासाठी करीत असतांना सर्वांगिण प्रगती झाली पाहिजे, प्रत्येक व्यक्ती, शारीरिक, आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे. याचे अनेक अनुभव जेव्हा आपण रूईभरला जातो-येतोच अनुभवायला येतात. या पद्धतीने शिर्डीचे साईबाबा, शेगांवचे गजानन महाराज, अक्कलकोटचे स्वामी समर्थ यांच्या संदर्भात जे काही ऐकायला व वाचायला मिळते. ते आप्पाबाबा सानिध्यात प्रत्यक्षात अनुभवायला मिळते.
आप्पाबाबांच्या 65 व्या प्रकटदिनाच्या निमित्ताने त्यांचे बालपण, त्यांनी जगलेले दिवस हे अंगावर शहारे आणणारे आहेत. ज्या पद्धतीने भक्त प्रल्हादाला, ज्या पद्धतीने साईबाबाला अनेक हालअपेष्टांना सामोरे जावे लागलेे. आणि आज रूईभर या ठिकाणी देवी म्हणजे दत्त आहे. बालाजी म्हणजे दत्त आहे. दत्त हा माझा बाप आहे. आणि दत्त हा आपल्या पद्धतीने जे व्यवस्थापन करतो व मॅनेजमेंट करतो ते खूपच आगळवेगळं आहे. 30 वर्षापूर्वी रूईभर येथे एका झोपडीत दत्ताची मूर्ती होती. अनुवाणी पायाने बाबा फिरत होते. त्यांचे बालपण कष्टात गेले. हे कधीही कोणाला सांगत नाहीत, याउलट रूईभरला येणार्या प्रत्येक भक्ताचे कल्याण झाले पाहिजे, हित झाले पाहिजे, त्याच्या अडचणी दुर झाल्या पाहिजे, अनेक संत महात्म्याना भेटण्याचा-पाहण्यााचा योग आला पण गुरूपौर्णिमेला भक्तांनी हत्ती आणण्याचे ठरवलं, हेलिकॅप्टर आणण्याचे ठरवले पण रात्री उशिरा उठून आप्पाबाबा म्हणतात, आपल्या हत्ती आणायचा नाही, आपल्या पुष्यवृष्टीसाठी हेलिकॅप्टर आणायचा नाही, लोक पाणीपाणी करत आहेत.
माझे मायबाप पाणी करत असतांना गुरूपौर्णिेमेचा उत्सव आपण औढंबर कराचे नाही. हे दुर्मिळ योग याच देही याच डोळा अनुभवायला मिळाला. हे शक्तीकेंद्र आहे. हे ऊर्जा केंद्र आहे. सातत्याने देश, धर्म, देव, संस्कृती रक्षणाचे कार्य आप्पाबाबा हे करीत आहेत. आम्ही त्यांना भविष्यकार म्हणणार नाही, पण आगळ्यावेगळ्या शक्तीच्या माध्यमातून त्यांचे जे कार्य आहे. त्याला आम्ही त्रीवार मानाचा मुजरा करतो. दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती या प्रमाणे हे शक्तीकेंद्र आज देशात अन् जगात वेगळ्या पद्धतीने कार्य करतांना दिसत आहेत. आज या तीर्थेक्षेत्रात एक रूग्णवाहिका, एक वाहन, एक मादुकरीचे वाहन या ठिकाणी भक्तगण देत आहेत. या ठिकाणचे कार्य हे अतुलनीय, अनाकलनीय आहे. दत्तस्वरूप म्हणजे देवस्वरूप आप्पाबाबा हेच या कार्यातून, या केंद्रातून या पद्धतीने मोफत दवाखाना चालवला जातो. याच पद्धतीने संस्काराचे कार्य ते ज्ञानदानाचे कार्य आज त्यांच्या माध्यमातून होत आहे. दै.मराठवाडा नेता परिवार व बद्दर परिवाराच्या वतीने त्यांच्या चरणी कोटी-कोटी प्रणाम. या ऊर्जा केंद्राच्या माध्यमातून समाजातील आपप्रवृती संपवून सत्प्रवृती वाढवाव्यात हिच प्रार्थना!

No comments:
Post a Comment