पुलवामा अटैक : नरेंद्र मोदी यांनी सैन्य दलाला दिला हा आदेश

Friday, February 15, 2019
नवी दिल्ली :
काल झालेल्या पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्याचा (Pulawama Terror Attack) तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला कठोर इशारा दिला आहे. ''पुलवामाच्या हल्लेखोरांनी मोठी चूक केली आहे आणि याची किंमत त्यांना चुकवावीच लागेल. भारतीय सैन्य दलाला संपूर्ण स्वातंत्र्य दिले गेले आहे' स्पष्ट इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले . 



पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना मी श्रद्धांजली अर्पित करतो. देशाची सेवा करताना त्यांनी आपले प्राण अर्पण केले. या दु:खद प्रसंगी मी त्यांच्या कुटुंबाचं सांत्वन करतो मला आपल्या सैनिकांच्या शौऱ्यावर पूर्ण विश्वास असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले . 

या हल्ल्यामागच्या शक्ती आणि गुन्हेगारांना निश्चितच शिक्षा मिळेल, अशा शब्दांत इशारा देतानाच भारताला उद्ध्वस्त करणाऱ्या देशाचे स्वप्न कधीही पूर्ण होणार नसून या हल्ल्याचे देशाची १३० कोटी जनता सडेतोड उत्तर देईल, भारतीय सैन्य दलाला संपूर्ण स्वातंत्र्य दिले गेले आहे'', पाकिस्तानला असा स्पष्ट इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. पंतप्रधांनांनी आज 'वंदे भारत' एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला. त्यावेळी संबोधित करताना त्यांनी हा इशारा दिला आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना मी श्रद्धांजली अर्पित करतो. देशाची सेवा करताना त्यांनी आपले प्राण अर्पण केले. या दु:खद प्रसंगी मी त्यांच्या कुटुंबाचं सांत्वन करतो असे पंतप्रधान मोदी म्हणाले

शेजारचा देश जी कृत्ये करत आहे, त्याने तो भारतात अस्थिरता निर्माण करण्यात यशस्वी होईल हे स्वप्न त्याने सोडून द्यावे. कारण हे कधीही होणार नाही. आर्थिक अडचणीतून जाणाऱ्या या देशाला असे वाटते की अशा प्रकारे भारताला उद्ध्वस्त करता येईल मात्र, हे कधीही शक्य नाही. या देशातील १३० कोटी जनता या हल्ल्याचे सडेतोड उत्तर देईल, अशा शब्दात पंतप्रधान मोदीयांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले.

या हल्ल्याचा अनेक देशांनी निषेध केला असून भारतासोबत असल्याचे म्हटले आहे. सर्व देशांनी दहशतवाद्यांविरोधात एकत्र येण्याची गरज आहे. माझी विनंती आहे की ही वेळ अतिशय संवेदनशील आहे. कुणी आमच्या बाजूचे असोत किंवा विरोधात, आम्ही सगळे राजकारणापासून दूर राहून या हल्ल्याचा देश एकजूट होऊन तोंड देवू या, अशा शब्दांत पंतप्रधान मोदींनी विरोधक आणि समर्थकांना आवाहन केले आहे

No comments:

Post a Comment