काँग्रेस पक्ष देशाचे जवान आणि सरकारसोबत : राहुल गांधी

Friday, February 15, 2019
नवी दिल्ली : काल झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ला हे अत्यंत निंदनीय कृत्य असून काँग्रेस पक्ष देशाचे जवान आणि सरकारसोबत आहे, असे सांगून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुलवामा हल्ल्याचा निषेध केला आहे.




ही वेळ राजकारण करण्याची नाही दहशतवाद्यांची देश तोडण्याचा कट कधीही यशस्वी होणार नाही, याबाबत सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या बाजूने आमचा पक्ष उभा राहील असा विश्वासही राहुल यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. या अनुशंगाने येणाऱ्या इतर कोणत्याही विषयावर बोलण्यास नकार दिला. या वेळी पत्रकार परिषदेत माजी पंतप्रधान आणि कांग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. मनमोहन सिंग यांनीही पुलवामा हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहिली. काँग्रेस पक्षाकडून सरकारला जी मदत लागेल ती सर्व केली जाईल, असेही डॉ. सिंग म्हणाले.

No comments:

Post a Comment