हरित शिवजयंती ठरणार महाराष्ट्राचे रोल मॉडेल : युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर

Sunday, February 17, 2019


निलंगा (राजेंद्र पवार)
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींच्या लोकांना एकत्रित करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली अश्या महान योध्दा ची सामाजिक जान व कार्य जपत निलंगा शहरात पाच एकर जागेवर हरित शिव छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा साकारण्यात येणार असून गुलाल,डॉल्बी,फटाके मुक्त हरित शिव जन्मोत्सव सोहळा साजरा करणार आहोत हा हरित शिव जन्मोत्सव हा संबंध महाराष्ट्रासाठी रोल मॉडेल ठरेल असे प्रतिपादन युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी निलंगा येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.  यावेळी व्यासपीठावर उपस्थित नगराधक्ष बाळासाहेब शिंगाडे,पंचायत सभापती अजित माने,चेरमन दगडू सोळुंके,सामाजिक कार्यकर्ते दत्ता शाहीर,डॉ लालासाहेब देशमुख, एम एम जाधव,आदी मान्यवर उपस्थित होते. 

पुढे बोलताना युवा नेते अरविंद पाटील  निलंगेकर महणाले की गेल्या वर्षी आक्का फाऊंडेशन च्या माध्यमातून शिव जयंती निमित्त विक्रमी रागोळी करून त्याची गिनीज बुकमध्ये नोंद करण्यात आली.  यावेळी ही लातूर व निलंग्याचे नाव सामाजिक जान व आपुलकी व सर्वधर्म समभाव जपण्यासाठी आक्का फाऊंडेशन गेल्या दोन वर्षांपासून नेत्रदान शिबीर,आरोग्य शिबीर ,व सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार निर्माण करण्यासाठी कार्यरत असून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सारखे अनेक उपक्रम राबवत आहे.

या शिवजन्मोतसव निमित्त हरित शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृतीसह एक रथ हत्ती ,बावीस घोडे,दोन हजार जिजाऊ वेशभूषा परिधान करून वेशभूषा परिधान केलेले छत्रपती शिवाजी महाराज, तीन हजार शाळकरी मुले त्याचबरोबर भिल्ल समाजाचे पारंपरिक वेशात एक पथक राहणार आहे ही मिरवणूक दिनांक 19 फेब्रुवारी रोजी सकाळी ठीक दहा वाजता निलंगा शहरातून जिजाऊ चौकातून सुरू होणार असून शिवाजी चौकापर्यंत निघणार आहे . 

मिरुवणुकित जहाज पथक लेझिम पथकाचा समावेश असणार आहे.  यामध्ये 1058 मुले स्वयसेवक महनून उत्स्फूर्तपणे सहभागी झाले आहेत . याचबरोबर कुठलीही धावपळ होणार नाही याची काळजी घेत वेवेगळ्या एकूण अकरा समित्या घटित केल्या असल्याचे सांगत ही मिरवणूक शिवाजी चौकात आल्यानंतर सायरा न वाजवून पुलवामा येथे दहशतवादी हल्यात वीरमरण आलेल्या 44 जवानांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे व संपूर्ण शहरात मिरवणूक काढण्यात येणार असून निळकंठेश्र्वर मंदिरात जाऊन मिरवणुकीची सांगता होणार आहे. त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी मैदानी खेळ ,गडा विश्यी माहिती व अनेक प्रत्यक्षात सादर करून निलंगेकरांची हाऊस फिटणार आहे.

शिवजयंती त मुस्लिम बांधव करणार शुर्कुंबा व पिण्याच्या पाण्याचे वाटप..
सामाजिक सर्वधर्म समभाव जपण्यासाठी व राष्ट्रीय ऐक्य जपण्यासाठी येथील मुस्लिम बांधव यांनी सुमारे तीस हजार लोकांना पुरेल येवढ्या शुर्कुंभाची व्यवस्था केली आहे..याची मोठ्या नवलाईने चर्चा होत आहे

No comments:

Post a Comment