संकेत हा परमेश्वर देत असतो याला म्हणतात भाग्य

Friday, February 15, 2019

लातूर, दि. १५ ः....
श्री बालाजी मंदीर जिर्णोद्धार प्राणःप्रतिष्ठापणा व साक्षात बालाजी दर्शन घेण्याचा मान लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. संभाजीराव पाटील निलंगेकर व माजी खासदार रुपाताई पाटील निलंगेकर यांना मिळाला. यावर सहज कुजबूज झाली, याला म्हणतात परमेश्वर हा संकेत देत असतो असा हा अद्भूत, अनाकलनीय, श्रद्धा, भक्ती व निष्ठेचा त्रिवेणी संगम.

 गेली आठ दिवस लातूर येथे सत्संगाचा सोहळा सुरु होता. गुरुवारी रात्री मंदिराच्या शिष्टमंडळाने पालकमंत्र्यांची भेट घेवून निमंत्रण दिले आणि योगायोग सकाळी ९ वाजता पालकमंत्री मंदिरात हजर झाले. एवढंच नाही तर ते मंदिराच्या कळसाकडे गेले. कळसाला स्पर्श करुन दर्शन घेतले. त्यानंतर मंदिरात आले. १०.१५ वाजता प्रचंड मंत्रघोषात पूजा होवून श्री बालाजीच्या मूर्तीचं दर्शन पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर व माजी खासदार रुपाताई पाटील निलंगेकर व वैशालीताई विलासराव देशमुख यांनी घेतलं. 

यावर सहज लोक म्हणाले, याला म्हणतात दैवी संकेत. परमेश्वर हा संकेत देत असतो. श्रद्धा, भक्ती आणि निष्ठेचं फळ म्हणजे पालकमंत्र्यांना पहिला दर्शनाचा मान मिळाला. खरोखर पालकमंत्री खूपच भाग्यशाली आहेत अशी सर्वत्र चर्चा होती. जवळ जवळ दीड ते पावनेदोण तास पालकमंत्री आपल्या आईसह मंदिरात उपस्थित राहून आनंद घेतला. यावेळी अध्यक्ष श्रीनिवासजी लाहोटी, सचिव विनोद अग्रवाल, कांताप्रसाद राठी, प्रकाश कासट, गिल्डा, पप्पु अग्रवाल, संतोष गिल्डा, गोविंद पारीख, रामेश्वर तिवारी हे होते. त्याचबरोबर पालकमंत्र्यांच्या डोक्याव संत, महंत, पंडीतांनी एक कलश दिला. खरोखर कांहीतरी परमेश्वरी संकेतच म्हणावे लागतील.

No comments:

Post a Comment