मूलायम सिंह यांनी भर लोकसभेत मोदी बद्दल केले हे विधान

Wednesday, February 13, 2019

नवी दिल्ली- समाजवादी पार्टीचे वरिष्ठ नेते आणि आझमगडचे खासदार मुलायम सिंह यादव यांनी मोठं विधान केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुसऱ्यांदा पंतप्रधान व्हावे, यासाठी माझ्या शुभेच्छा आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे मी त्यांना पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी शुभेच्छा देतो. 

आम्हाला बहुमत मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे तुम्हीच पुन्हा देशाचे पंतप्रधान व्हा' असे विधान मुलायम यांनी मोदींकडे पाहून केले. त्यावर सभागृहात हास्याची लकेर उठलीच शिवाय सत्ताधारी सदस्यांनी बाके वाजवून मुलायम यांच्या विधानाचे स्वागत केले. 

मोदी नेहमीच चांगलं काम करत आले आहेत. त्यांनी नेहमीच माझी मदत केली आहे. मोदींचं कौतुक केल्यानंतर समाजवादी पार्टीचे नेते मुलायम सिंह यादव यांनी मोदींना हात झोडून अभिवादनही केलं आहे.

 आमच्या बातम्या आपल्या मोबाईल वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 

No comments:

Post a Comment