टेम्पोच्या धडकेत पोलिस कर्मचारी जागीच ठार

Wednesday, February 13, 2019

चाकुर:  तालुक्यातील नळेगाव रोडवर वाहनांची तपासणी करीत थांबले असता भरधाव वेगात वडवळ नागनाथ येथून मुंबईकडे जात असलेल्या टेम्पो चालकाने पोलिस कर्मचारी नागेश सुर्यकांत चौधरी यांना जोराची धडक दिली.यात ते जागीच ठार झाले. 
घरणी (ता. चाकूर) येथील महामार्ग पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी वाहनांची तपासणी करीत असताना भरधाव वेगातील टेम्पोने धडक दिल्यामुळे पोलिस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (ता. 13) सकाळी 7 च्या सुमारास घडली आहे.

महामार्ग पोलिस ठाण्याचे पाच कर्मचारी सकाळी 7 च्या सुमारास लातूर - नांदेड रस्त्यावरील नळेगाव रोडवर वाहनांची तपासणी करीत थांबले असता भरधाव वेगात वडवळ नागनाथ येथून टोमॅटो घेऊन मुंबईकडे जात असलेल्या एम. एच. 03 सी. टी. 3450 क्रमांकाच्या टेम्पो चालकाने पोलिस कर्मचारी नागेश सुर्यकांत चौधरी (वय 32) (रा. देवंग्रा ता. औसा) यांना जोराची धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. मयत नागेश चौधरी हे सात वर्षापासून पोलिसांत नोकरी करीत असून एक वर्षापासून महामार्ग पोलिस ठाण्यात कार्यरत होते. लातूर येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन केले जात आहे, चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

No comments:

Post a Comment