सेनगाव पोलिसात चौघाविरूद्ध गुन्हा
हिंगोली / प्रतिनिधी
सेनगाव तालुक्यातील जयपूर येथे चौघांनी एका महिलेच्या घरात प्रवेश करून मारहाण करत गुप्तांगात मिरचीपुड टाकल्याची धक्कादायक घटना घटली असून या प्रकरणी महिलेच्या फिर्यादिवरून 4 आरोपी विरूद्ध सेनगाव पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार 4 डिसेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता आरोपी संतोष पंडीत, विकास पंडीत, वामन पंडीत, विठल पंडीत सर्व रा. जयपूर यांनी पिडीत महिलेच्या घरात जबरदस्ती प्रवेश करून अश्लील भाषेत शिवीगाळ केली. तसेच पिडी महिलेच्या अंगासह गुप्तांगावर मिरचीपुड टाकून बाजेच्या लाकडी ठाव्याने, लाकडी दांड्याने मारहाण करत. अश्लील भाषेत शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून चौघा आरोपीविरूद्ध कलम 452, 354 अ, 324, 294, 323, 504, 506, 34 भादंवी कलमान्वये सेनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सेनगाव पोलिसांच्या वतीने तपास सुरू आहे.
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर
No comments:
Post a Comment