अहमदाबाद: आरोग्य क्षेत्रात जगाच्या पाठीवर भारत देश पिछाडीवर असल्याचे बोललेजाते किंवा तसे चित्र रंगवले जाते परंतु भारताच्या आरोग्य विश्वात क्रांती घडिवणारी घटना गुजरात मध्ये घडली आहे हृदयविकाराने त्रस्त असणाऱ्या महिलेवर चक्क यंत्रमानव अर्थात रोबोटने यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे . टेलिरोबोटिक कोरोनरी प्रक्रियेने करण्यात आलेलीही जगातील पहिलीच शस्त्रक्रिया असून यामुळे दुर्गम भागातील रुग्णांपर्यंत रुग्णसेवा पोहोचवणं आता शक्य होणार आहे.
ही शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉ पटेल दोन वर्षांपासून तयारी करत होते. अमेरिकेच्या कॉरिन्डस कंपनीने हे तंत्रज्ञान विकसीत केलं आहे. या तंत्रज्ञानाचा पहिला प्रयोग २००१मध्ये करण्यात आला होता. 'ही शस्त्रक्रिया गुजरात आणि भारताच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाटं पाऊलं आहे' अशी प्रतिक्रिया गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी व्यक्त केली आहे.
गुजरात राज्यातील अहमदाबादच्या अक्षरधामच्या मंदिराच्या आवारात बसून डॉ तेजस पटेल यांनी ३२ किमी दुर असलेल्या अपेक्स रुग्णालयातील एका महिलेवर एन्जियोप्लास्टीची यशस्वी शस्त्रक्रिया केली. रुग्ण महिलेच्या ह्रदयात अनेक ब्लॉकेजेस झाले होते. त्या महिलेला मध्यंतरी ह्रदयविकाराचा झटकाही आला होता. अशा परिस्थितीत तिच्यावर शस्त्रक्रिया करणे अत्यंत गरजेचे होते. अशावेळी टेलिरोबोटिक प्रक्रियेचा वापर करण्याचा विचार डॉक्टरांनी केला. या प्रक्रियेत टेलिमेडिसीन आणि रोबॉटिक्सचा वापर केला गेला. एका रोबॉटिक हॅण्डच्या साहाय्याने ही शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आली. पण या रोबॉटिक हॅण्डचं रिमोट कंट्रोल बटन मात्र अक्षरधाम मंदिरात डॉक्टरांच्या हातात होतं. त्यांनी या हॅण्डच्या साहाय्याने औषधं देण्यापासून शस्त्रक्रिया पूर्ण करेपर्यंत सगळं काही निर्विघ्नपणे पार पाडलं. जेव्हा डॉ पटेल ही शस्त्रक्रिया करत होते तेव्हा मुख्यमंत्री विजय रुपानी त्यांच्या बाजूलाच बसून सगळ्या गोष्टींवर बारीकपणे लक्ष ठेवून होते. या शस्त्रक्रियेकडे मोठं यश म्हणून पाहिलं जातं आहे.
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर
No comments:
Post a Comment