नागपूर : भारत सध्या विकास प्रक्रियेत प्रचंड वेगाने प्रगती करत असून,देशात पायाभूत सुविधा उभारण्यावर भर देत आहे. या विकास प्रक्रियेत विदेशी गुंतवणूकदारांना सहभागी होण्यास सांगून विदेशी गुंतवणूकदारांना भारतात गुंतवणूक करण्याची सुवर्णसंधी असल्याचे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
केंद्रीय भूपृष्ठ परिवहनमंत्री नितीन गडकरी यांची विविध विदेशी शिष्टमंडळांनी मानकापूर स्थित विभागीय क्रीडा संकुल येथे इंडियन रोड काँग्रेसच्या वतीने आयोजित 79 व्या अधिवेशनात भेट घेऊन चर्चा केली. त्यावेळी ते विदेशी शिष्टमंडळांशी बोलत होते.
यावेळी बोलताना श्री. गडकरी म्हणाले, पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भारताचा भर आहे. त्यामध्ये देशातील रस्ते महामार्ग, रेल्वे, जहाजबांधणी, बंदरे,नद्यांमधून करण्यात येणारी जलवाहतूक, विमानतळ बांधणीवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे देशातील पायाभूत सुविधा उभारणी आणि त्यांचे बांधकाम, त्यात लागणारे साहित्य यामुळे गुंतवणुकीत प्रचंड वाव आहे. उज्वल भारताच्या पायाभरणीत गुंतवणूकदारांनी सहभागी व्हावे. विदेशी गुंतवणुकीची‘मेक इन इंडिया’ आणि ‘मेड इन इंडिया’ला गरज असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment