भाजप सरकार मधून बाहेर कश्मीर मध्ये राजकीय भूकंप

Tuesday, June 19, 2018

नवी दिल्ली:

जम्मू-काश्मीरमध्ये झालेली अशांतता, दहशतवाद, पत्रकार  बुखारी यांची हत्या,  विकास कामांना बसलेली खिळ आणि मुख्यमंत्री मुफ्ती यांना राज्यकारभार सांभाळण्यात आलेल्या अपयशाचं कारण देत भाजपने जम्मू-काश्मीरमधील पीडीपी सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. भाजपने काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे.भाजपचे नेते राम माधव यांनी पत्रकार परिषद घेऊन पीडीपी सरकारमधून भाजप बाहेर पडत असल्याची घोषणा केली.
भाजपने पाठिंबा काढून घेताच मुख्यमंत्री महबूबा मुफ़्ती यांनी राजीनामा दिला आहे 




 मुफ्ती सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याची चिठ्ठी जम्मू-काश्मीरच्या राज्यपालांना सोपवण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. केंद्रीय गृहमंत्रालय, सर्व यंत्रणांचा सल्ला घेऊन आणि काश्मीरमधील तीन वर्षाच्या कार्यकाळाचा आढाव घेऊनच सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेण्यात आल्याचंही राम माधव यांनी यावेळी स्पष्ट केलं.

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment