डास दाखवा, दहा हजार रूपये बक्षिस मिळवा अलगरवाडीचा अभुतपूव पॅटर्न , महाराष्ट्रभर राबवावा

Tuesday, June 19, 2018

काल १७ जून रोजी लातूर जिल्ह्यात ज्या महत्वाच्या घडामोडी घडल्यात. त्यात लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी आपल्या भाषणात इंद्रप्रस्थ जलभुमी अभियानाअंतर्गत अलगरवाडी ता. चाकूर येथील ग्रामपंचायतीचा खास उल्लेख केला. आम्ही पालकमंत्र्याला धन्यवाद देवू इच्छितो. त्यांचे आभार मानू इच्छितो. कारण अलगरवाडी पॅटर्न हा संपुर्ण महाराष्ट्रात राबवावा अशा प्रकारचे जाहीर वक्तव्य त्यांनी काल केले. 


ना. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी इंद्रप्रस्थ जलभुमी अभियानाअंतर्गत चाकुर तालुक्यातील अलगरवाडीला भेट दिली होती. त्यावेळा त्यांना लक्षात आलं. अलगरवाडी हे गाव असं आहे. गावचे सरपंच गोविंदराव माखणे यांनी संपुर्ण गावात शोष खड्डे केलेले आहेत. मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केलेले आहे. पुनर्भरणाचे काम जोरात सुरू आहे. शाळा ई-लर्निंग आहे. यासाठी हाऊस लागते आणि गोविंदरावांनी हे काम करता असताना या गावाच्या सर्वांनी जी साथ दिली. जे सहकार्य केले त्याबद्दल समस्त अलगरवाडीकर यांचे दैनिक मराठवाडा नेताच्या वतीने अभिनंदन.
अलगरवाडीला कोण कोण भेटी दिल्या. पालकमंत्र्यांनी भेट दिली. शब्द दिला मुख्यमंत्र्यांना येथे आणणार काशि जगद्गुरूची भेट झाली. परवा केदार जगद्गुरूंची भेट झाली त्याबद्दल जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी भेट दिली आणि असे सरपंच खर्‍या अर्थानं हे गावची माझे घरं या भुमिकेतून काम करत आहेत. नसता ग्रामपंचायतीमध्ये आडवा आणि जिरवा असंच चालत. पण गोविंदराव माखणे ज्या पद्धतीने जिद्दीने काम करता आहेत. माझ्या जन्मभुमिच, माझ्या अलगरवाडीचे नाव सगळीकडे झालं पाहिजे. आणि त्यांचे सुपूत्र फॉरेन रिटर्न, अभ्यासू आणि एक प्रेमळ व्यक्तीमत्व व नावाप्रमाणेच चौका आणि छक्के मारणारे कपिल माखणे यांनाही आम्ही धन्यवाद देवू इच्छितो. कदाचित बाप से बेटा सवयी याप्रमाणे त्यांच्या कामाची पद्धत आहे. त्यांचे ज्येष्ठ मार्गदर्शक विठ्ठलरावजी माखणे यांनी महाराष्ट्रात चाकूर सोसायटीचा झेंडा फडकविला.
या प्रसंगाच्या माध्यमातून सरपंच गोविंदराव माखणे त्यांचे सर्व सहकारी ग्रामस्थ यांना विनंती करू इंच्छितोत की, अण्णा हजारेंचे राळेगण सिद्धी, पोपट पवारांचे गाव त्याप्रमाणे चाकुर तालुक्यातील अलगरवाडीचा नावलौकिेक हा महाराष्ट्रभर व्हावा. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून व इंद्रप्रस्थ जलभुमि अभियानाच्या माध्यमातून या गावचा नावलौकिक आणखीन वाढावा तो खुप खुप वाढावा लोकांनी इथलं जंगल, येथील वृक्ष, येथील शोषखड्डे, येथील पुनर्भरण पाहण्यासाठी यावं, येथील शाळा पाहण्यासाठी यावी येथे श्रद्धा आहे. येथे भक्ती आहे. श्रद्धा कामावर आहे. आणि भक्ती चांगल्या कामाची आहे. जेथे श्रद्धा आणि भक्ती असते. तेथे परमपीता परमात्मा हा उभा राहत असतो. या कामाला दृष्ट न लागावी हीच अपेक्षा करत असताना या ठिकाणची ग्रामपंचायत, या ठिकाणीची शाळा व या ठिकाणचे रस्ते एक पारदर्शक लोकाभिमुख ग्रामपंचायत कशी असू शकते हे अलगरवाडीकरांनी व गोविंदराव माखणे, कपिल माखणे, विठ्ठलराव माखणे आणि तमाम अलगरवाडीकरांनी गावची पत, ऐपत व भुगर्भातील पाण्याची पातळी वाढवून पाणीदार व बाणेदार अलगरवाडी नव्हे तर अलगदवाडी बनवावी. संपुर्ण महाराष्ट्रभर या गावचा नावलौकिक वाढवावा. डास मुक्त गाव करत असताना हे गाव निरोगी रहावं. येथे आरोग्य सुविधा दिल्या जात आहेत. त्या अधिकात अधिक दिल्या जाव्यात. आणि एक गावचा सर्वांगिण विकास, समतोल विकास व्हावा. या ठिकाणी भविष्यात होणारी वृक्ष लागवड , वृक्ष संवर्धन व्हावे व सुंदर अलगरवाडी, स्वच्छ अलगरवाडी, देखणी अलगरवाडी, निरोगी अलगरवाडी बनावी हीच इच्छा.

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment