अर्थमंत्र्यांनी केले अर्थपुर्ण कार्य , महाराष्ट्रातील एका पत्रकाराची हटके कामगिरी
लातूर येथे १७ जून रोजी लातूरचे भुमिपुत्र लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार अतुल कुलकर्णी यांच्या बिनचेहर्याची माणसं या पुस्तकाच्या तिसर्या आवृत्तीचे प्रकाशन महाराष्ट्राचे अर्थमंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हयाचे पालकमंत्री ना. संभाजीराव पाटील निलंगेकर होते. या कार्यक्रमास आरोग्य सेवेसाठी ज्यांनी मराठवाड्यात सर्वांनी उल्लेख करावा असं कार्य करणारे डॉ. अशोक कुकडे, मुख्यमंत्र्याचे खाजगी सचिव अभिमन्यु पवार, डॉ. महेंद्रकर व आ.सुधाकर भालेराव, जॉईंट रजिस्टार श्रीकांत देशमुख व ज्या संस्थेच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या श्रीमती गुणवंती बेण ठक्कर, सेवाभावी संस्थेचे मार्गदर्शक तथा उद्योजक अजय ठक्कर, संस्थेचे अध्यक्ष हनुमंत जगताप हे उपस्थित होते. हा कार्यक्रम लातूर शहराच्याच नव्हे तर मराठवाड्याच्या इतिहासात सर्वांनी अतुलनिय युनिक कार्यक्रम म्हणावा लागेल. या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार अतुल कुलकर्णी यांनी अर्थमंत्र्याकडे ज्या मागण्या मांडल्या. त्या महत्वाच्या एवढच नाही तर त्या मागण्यांचे तेवढ्याच गांभिर्याने दखल घेणे याबद्दल आम्ही अतुल कुलकर्णी यांना धन्यवाद देवू इच्छितो. त्यांना शुभेच्छा देवू इच्छितो. आणि एक लातूरकर म्हणून त्यांचे आभार मानू इच्छितो.
कार्यक्रम होता एका सेवाभावी संस्थेचा व पुस्तकाचे प्रकाशन पुस्तकाचे नाव होते बिनचेहर्याची माणसं एक लेखक म्हणून, एक पत्रकार म्हणून अतुल कुलकर्णी यांनी ही पुस्तक महाराष्ट्राच्या सर्व ग्रंथालयात सर्व शाळेत घेतली जावीत. फार-फार तर प्रत्येक ग्रंथालयात दहा-दहा पुूस्तकाच्या प्रति खरेदी कराव्या अशी मागणी साधारणता केली जाते. पत्रकार म्हणल्यानंतर एक-दोन बदल्या करा एखादा दुसरा फ्लॅट द्या अशी मागणी होते. पण नावाप्रमाणेच अतुल यांनी जी मागणी केली. माझी जन्मभुमी या जन्मभुमीत गेली ३० वर्ष नाट्यगृहाचा प्रश्न सोडविला जात नाही. नाट्यागृहाचा फुटबॉल सर्व राजकीय नेत्यांनी केला. पण अतुल कुलकर्णी यांनी या भुमिचे अनेक नाट्य कलावंत आहेत. महाराष्ट्रात नावलौकिक आहे. येथे नाट्यगृह पाहिजे ही भुमिका मांडली, येथे चांगले नियोजन भवन असावं. येथे महानगरपालिकेची चांगली इमारत असावी, लातूरा शहरात सतत विज कट होण्याचा लपंडाव थांबावा म्हणून मोठा सौरउर्जा प्रकल्प राबवावा अशी मागणी केली.
प्रसिद्धसाठी मागणी करणे हे वेगळे पण एक संवेदनशील पत्रकार एका संवेदनशील अर्थमंत्र्याला मागणी करतो. ते अर्थमंत्री विकासासाठी जे अधिन आहेत. ते सुधीर भाऊ यांनी जाहीर केले की, नाट्यगृहाला त्वरीत जागा बघा. चांगले प्लॅन करा तात्काळ निधी दिला जाईल. नियोजन भवनचा प्लॅन करा निधी दिला जाईल. हे १७ जून रोजी दुपारी साडेबारा वाजता शब्द दिला जातो.
१८ जून रोजी सकाळी वित्तमंत्री आपल्या कार्यालयातून जे पत्र पाठवितात. त्या पत्रकात नमूद करतात की, १७ जून २०१८ रोजी मी लातूर येथे श्री अतुलजी कुलकर्णी यांच्या बिनचेहर्याची माणसं या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला आलो असताना लातूर येथे नाट्यगृहाचे बांधकाम तसेच नियोजन भवनाच बांधकाम करण्याच्या मागणीच्या अनुषंगाने मी घोषणा केली आहे. या घोषणेची पुर्तता करण्याच्या दृष्टीने अर्थात नाट्यगृृहाचे व नियोजन भवनाचे बांधकाम करण्यासंबंधी वास्तुविशारदाच्या माध्यमातून आराखडे तयार करावे. अंदाज पत्रक व आराखड्यासह प्रस्ताव तातडीने सादर करावा. लातूर येथे नाट्यगृहाचे तसेच नियोजन भवनाचे बांधकाम लवकरात लवकर सुरूवात होण्याच्या दृष्टीने आपण स्वत: जातीने लक्ष घालावे असे पत्र जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांना पाठवितात. याची एक प्रत जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, ज्येष्ठ पत्रकार अतुल कुलक र्णी, तिसरी प्रत मुख्यमंत्र्यांचे स्वीयसहाय्यक अभिमन्यु पवार यांच्या माहितीस्तव व कार्यवाहीस्तव पाठवतात. कोटी कोटी मोलाचे आहे. याबद्दल आम्ही अतुल कुलकर्णी व अर्थमंत्री मुनगंटीवार यांचे अभिनंदन करू इच्छितो.
कारण मागण्या मागायच्या असतात. घोषणा करायच्या असतात. प्रश्न सारखे लोंबकळत ठेवायचे असतात. असे घडत असताना अर्थमंत्र्यांनी ज्या गांभीर्याने, संवेदनशीलतेने हा प्रश्न सोडविण्यासाठी १८ तासाच्या आत पत्र पाठवितात. खरं म्हणजे हा लातूरमधला घडलेला साक्षातकार, चमत्कार हा दृष्टांत आहे. आम्ही हे कार्यक्रम आयोजित करणारे अजय ठक्कर, डॉ. महेंदरकर, जगताप यांना धन्यवाद देवू इच्छितोत. कारण एक चांगल्या प्रकारचा कार्यक्रम एक सुरेख नियोजन असलेला कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमाची एवढी चांगली फलसृती आणि स्वातंत्र्य प्राप्तीनंतर जे घडु शकले नाही. जे घडायच आणि बिघडायच असंच घडत आलं. भारतरत्न लता मंगेशकर यांनी नाट्यगृह उद्घाटनाला मी येते नाटयगृहाला नाव देण्यास मंजूरी दिली. पण ते घडल नाही. आम्ही सुधीर भाऊंना धन्यवाद देवू इच्छितेा. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर पहिल्यांदा एक पत्रकार काय करू शकतो. हे सुधीर भाऊंनी दाखवून दिल. त्या पत्रकाराची पत वाढविण्याचे काम, लातूरकरांची ऐपत वाढविण्याचे काम या ठिकाणी घडलयं. आणि अतुल म्हणजे युनिक यांना धन्यवाद देवू इच्छितो.
लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांना धन्यवाद देवू इच्छितो. कारण त्यांच्या जन्मदिनाच्या दिवशी हे पत्र आलेल आहे. ते पत्र आम्ही येथे छापत आहोत. आणि जी श्रीकांत एखादी गोष्ट ठरवितात. तेव्हा ते डंके के चोट करतात म्हणून हा विषय हे नाट्यगृह सा.बां. विभागामार्फत बांधले जावे. जागा निश्चित करून एवढ्याच तत्परतेने भुमिपुजन व्हावे. आणि उद्घाटन व्हावे हा विषय महानगरपालिकेकडे येता कामा नये कारण पुन्हा फुटबॉल होण्याची भिती वाटते. अतुलजी खुप मोठे व्हा. अतुल कुलकर्णी नगरसेवक नाही, आमदार नाहीत फक्त अतुल कुलकर्णी लातूरकर आहेत. आणि त्यांच्या मागण्या या अर्थमंत्र्यांनी अत्यंत गांभीर्याने घेतल्या. तात्काळ पत्र पाठविले. आणि त्यात स्पष्ट उल्लेख केलाय ही घोषणा मी अतुल कुलकर्णी यांच्या कार्यक्रमात केली. आणि या कामाला गती येण्यासाठी त्यांनी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर व मुख्यमंत्र्यांचे सचिव अभिमन्यु पवार यांनाही जाहीर सांगितले आणि त्या पत्रात उल्लेख केला याबद्दल आम्ही सर्वांना धन्यवाद देवू इच्छितो.
मराठवाडा ,महाराष्ट्र तसेच देश विदेशातील ब्रेकिंग बातम्या
वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा मराठवाडा नेता चे मोबाईल App ह्या लिंकवरून.
या कार्यक्रमात अर्थमंत्र्यांनी जे भाषण केले ते अत्यंत अभ्यासपुर्ण आणि महत्वाच वाटत. कारण एस म्हणने होय ज्यांच्या नावाची सुरूवात एस पासून आहे. ते संभाजीराव ते श्रीकांत त्यांनी नो म्हणायचं नसतय. खरोबर गेली अनेक वर्ष लातूरकर नाट्यगृहाची आतुरतेने वाट पहात आहे. ते नाट्यगृह अतुल कुलकर्णी यांनी जोर का धक्का दिलेला आहे. हे नाट्यगृह लवकरात लवकर भुमिपुजन व्हावे. ज्या पद्धतीने अर्थमंत्र्यांनी युद्ध पातळीपेक्षा गतीने कार्यवाही केली त्याच्यापेक्षा अधिक गतीने जिल्हाधिकार्यांनी याला गती द्यावी व खर्या अर्थाने देर आये दुरूस्त आये म्हटल्याप्रमाणे हे नाट्यगृह लवकरात लवकर व्हावे अशा प्रकारची दैनिक मराठवाडा नेताच्या वतीने शुभेच्छा आणि या संपुर्ण कार्याबद्दल मनपुर्वक हार्दिक शुभेच्छा. १७ जून हा लातूरच्या इतिहासात स्वर्ण अक्षराने नोंद होणारा दिवस या कार्यक्रमात जी भाषणे झाली तीही खुप आणि खुपच चांगली, अभ्यासपुर्ण व खर्या अर्थाने अर्थपुर्ण झाली हे म्हटलं तर चुकीच किंवा धाडसाचं ठरणार नाही.
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर


No comments:
Post a Comment