साडे सहा हजराचा दंड
मुख्याधिकारी पाटील यांची कार्यवाही
हिंगोली / प्रतिनिधी
नगर पालिकेच्या वतीने शहरात कॅरीबॅग वापरावर बंदी घालण्यात आली असलीतरी काही व्यापाऱ्यांकडून चोरीछुप्या पद्धतीने वापर सुरू आहे. सोमवारी, (दि.१८) नगर पालिकेच्या पथकाने शहरातील गूल मंडई भागात कार्यवाही करीत सुमारे हनीकारक असलेल्या ७ क्विंटल कॅरीबॅग जप्त केल्या असून ऐकून ६ हजार ४०० रुपयांचा लावण्यात आला आहे. अशी माहिती नगर पालिकेचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी दिली.
हिंगोली शहरात प्लास्टीक कॅरीबॅग वापरावर नगर पालिकेच्या वतीने मागील वर्षभरापुर्वीच बंदी घातली होती. शिवाय त्यावेळी अनेक दुकानदारांविरूद्ध कार्यवाहीचा बडगाही उगारला होता. शिवाय शहरात नगर पालिकेच्या पथकांकडून ठिकठिकाणी तपासणी मोहीम राबवून कुठेही हनीकारक कॅरीबॅगचा वापर होणार नाही, याची काळजी घेण्यात येत होती. मध्यंतरीच्या काळात ही मोहीम थंडावल्यानंतर शहरातील किरकोळ तसेच मोठ्या व्यवसायिकांनी कॅरीबॅगचा सर्रास वापर करणे सुरू केले होते. शिवाय शहरात काही ठिकाणी कॅरीबॅग तयार करण्याच्या मशीनही चालविल्या जात होत्या. जागोजागी नागरिकांच्या हातात कॅरीबॅग आढळून येत असल्याने नगर पालिकेचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी स्वत: शहरात फिरून पाहणी केली. त्यावेळी गूलमंडई भागात एका व्यापाऱ्याकडे कॅरीबॅगचा मोठा साठा आढळून आला. हा साठा पथकातील अधिकाऱ्यांनी जप्त केला असून, सुमारे ७ क्विंटलवर त्याचे वजन आहे.
त्यात भारत गारमेंट, ओमसाई प्लास्टीक, रामकिशन अग्रवाल, अग्रवाल जर्दा, सोमानी किराणा, शर्मा भजियेवाले, भारत गारमेंट यांच्याकडून कॅरिबॅग जप्त करून प्रत्येकी ५०० रूपये दंड लावण्यात आला आहे. तर जवाहर मुंदडा याच्याकडून ४ क्विंटल कॅरिबॅग जप्त केल्या असून, त्यास १ हजार रूपये दंड लावला आहे. उल्हास गुंजकर, निवृत्ती घुगे, गणेश बगाटे, मो.अली शेख रहीम, शेख मुखीद, शेख रशीद, कमल हेंद्रे, नामदेव ठाकरे यांना प्रत्येकी २०० रूपयांचा दंड लावण्यात आला आहे. ऐकून ६ हजार ४०० रुपयांचा लावण्यात आला आहे. ही कार्यवाही मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी स्वतः उपस्थित राहून केली. या सदर मोहीमेत सवच्छंता निरीक्षक बाळु बांगर, कार्यालयीन आधिक्षक एस.जे सुर्यवंशी, सिध्दाहर्थ गायकवाड, प्रविण थोरात, बि.ए जाधव, शिवाजी धुगे, कैलास थिटे, पंडीत मस्के, प्रविण चव्हाण, नागेश नरवाडे, संजय दोडल ,गजानन आठवले. संदीप घुगे, विजय रामेश्वरे, मनोज बुर्से, अमरसींग ठाकुर गजानन टाले, दिनेश वर्मा आणि इतर सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.या धडक कार्यवाही मुळे शहरात खळबळ उडाली आहे.

No comments:
Post a Comment