लातुर/ प्रतिनिधी :लातूरचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी आपला वाढदिवस मनपा शाळेतील विद्यार्थ्यांसोबत साजरा केला . या शाळेतील सहावीचा वर्ग दत्तक घेताना शाळेसाठी खासदारांकडून दहा लाख रुपये निधी मिळवून दिला .
लातूरचे जिल्हाधिकारी जी .श्रीकांत यांनी लातूर येथे रुजु झाल्यापासून हटके काम करण्याच्या प्रयत्न केला आहे त्यामुळे ते कायम चर्चेत राहत आले आहेत. सोमवारी दिनांक 18 जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांचा वाढदिवस होता . शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या कडून भेट स्वरूपात पुष्गुच्छ अथवा भेटवस्तू न स्वीकारता त्यांनी वह्या देण्याचे आवाहन केले होते. हॉटेलिंग , पार्टी या माध्यमातून वाढदिवस साजरा करण्याऐवजी शाळेतील विद्यार्थ्यांसोबत तो साजरा करूत भेट स्वरूपात प्राप्त वह्या मनपा शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता .त्यासाठी महापालिकेच्या शाळा क्रमांक 9 मध्ये जिल्हाधिकारी सहकुटुंब दाखल झाले .यावेळी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत पुष्वृष्टी ने केले. जिल्हाधिकाऱ्यांनी शाळेतील मुलांसोबत मिळून -मिसळून अगदी शालेय विद्यार्थ्यांप्रमाणे त्यांच्याशी समरस होत विद्यार्थ्यांसोबत केक कापून वाढदिवस साजरा केला. जिल्हाधिकऱ्यांना भेट स्वरूपात मिळालेल्या दोन हजार वह्या त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना वाटप केल्या . एवढेच नव्हे तर सहावीच्या वर्गात असतानाच आपल्या जीवनाला कलाटणी मिळाली त्यामुळे या शाळेतील सहावीचा वर्ग दत्तक घेण्याची घोषणा त्यांनी केली . सहावीच्या वर्गातील 29 विद्यार्थ्यांचा संपूर्ण शैक्षणिक खर्च आपण करू असे आश्वासन देऊन या वर्गाची संपूर्ण अंतर्गत सजावट करून या वर्गाला डिजीटल क्लासरुम बनवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले .शाळा राज्यातील एक आदर्श शाळा म्हणून नावारूपाला येण्यासाठी जे जे शक्य असेल ते करू असे ते म्हणाले .
खासदार डॉ सुनिल गायकवाड यांचाही मंगळवारी वाढदिवस होता .यावेळी खासदारांना दूरध्वनी करून जिल्हाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या . त्यांनी शुभेच्छांचा स्वीकार केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना शाळेसाठी निधी देण्याची विनंती केली .खासदारांनीही ती लगोलग मान्य करीत दहा लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले .
शाळेच्या संपूर्ण परिसरात फिरुन जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली .
या कार्यक्रमाचे आयोजन नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे यांनी केले.
यावेळी मुख्याध्यापक शिवदास शिंदे , डॉ दत्ता गोजमगुंडे, डॉ अरुण मोरे, नगरसेविका पूजा पंचाक्षरी, सुभाष पंचाक्षरी, हमीद बागवान, खाजांमिया शेख, पुष्प राज खुब्बा, राधाकिशन कासले, संतोष साब दे, उमेश कांबळे, ओमकार सोनवणे, प्रसाद शिगे, राम गोरड, करण कांबळे, महेश ढोबळे, जाफर शेख , पांडुरंग बालवाड यांचीही उपस्थिती होती . जिल्हाधिकार्यांनी आपला वाढदिवस महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांसोबत साजरा केल्यामुळे विद्यार्थी आनंदून गेले


No comments:
Post a Comment