वसमत येथे चक्क रेल्वे तिकीटाचा काळा बाजार

Thursday, June 28, 2018

एकास न्यायालयीन कोठडी

वसमत / प्रतिनिधी
वसमत येथे रेल्वेच्या ई-तिकीटाचा काळा बाजार करून पैसे हडपणाऱ्या एकाला रेल्वे पोलीसांनी अटक करून औरंगाबाद येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी रेल्वे न्यायालयाच्या समोर उभे केले याप्रकरणी त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

जिल्हाभरात ऑनलाईन सर्व्हिसेसच्या माध्यमातून सेवा देणारी केंद्र जागोजागी थाटले आहेत. ऑनलाईनच्या जागा या केंद्राच्या माध्यमातून अनेक कामे सुकर होतात.

पण वसमत येथील मामा चौकात असलेल्या बालाजी ऑनलाईस सर्व्हिसेसच्या चालकाने नामी शक्कल लढवत चक्क रेल्वेच्या ई-तिकीटाचा काळा बाजार चालविला. ही कुनकू न रेल्वे पोलीसांना लागल्याने पुर्णा रेल्वे सुरक्षा बलाच्या विशेष पथकाने या बालाजी ऑनलाईन सर्व्हिंसेस सेंटरवर छापा मारला. याबाबत अधिक चौकशी केली असता 53 हजारांचे रेल्वेचे ई-तिकीट व विविध बनावट कार्ड तयार करून अतिरीक्त पैसे घेवून ऑनलाईन तिकीट काढताना चालक बालाजी गुंडाळे रा. वसमत यास ताब्यात घेतले. ही कारवाई फौजदार संजय बोटकर, शेख जावीद, विनोद पाटील, मनोज कांबळे यांच्या पथकाने केली.

याप्रकरणी आरोपी बालाजी गुंडाळे याला औरंगाबाद येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी रेल्वे न्यायालयासमोर हजर केले असता त्यास न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणामुळे वसमत तालुक्यासह जिल्हाभरात रेल्वे तिकीटाचा काळाबाजार होत असल्याची शंका उपस्थित केली जात आहे. त्यामुळे अशा एजंटांंची चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी होत आहे. या ऑनलाईन घोळामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment