अर्धी चड्डीवाले ''एमआयएम" चा मुकाबला करू शकत नाहीत ;एमआयएम ला सेनाच पुरून उरेल उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचा संघावर हल्लाबोल

Thursday, June 28, 2018

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचा संघावर हल्लाबोल 

लातूर दि प्रतिनिधी 
मराठवाड्याने या पूर्वीच रझाकाराना चारीमुंड्या चित  केलय आता त्याच रझाकारांची औलाद असणाऱ्या एमआयएमच्या पिलावळाचा शिवसेना बंदोबस्त करेल आमचा शिवसैनिक त्यांना पुरून उरेल असा इशारा देऊन उद्योगमंत्री सुभाष  देसाई यांनी  शिवसेनेने कधीही जातीयवाद केला नाही परंतु जातीयवादी फुत्कार काढणाऱ्या ओवेसी ला या ठिकाणी सभा घेण्यास गृह खाते परवानगी देतेच कसे ? आसा सवाल उपस्थित करून आर्धी चड्डी घालणाऱ्या एमआयएमचा मुकाबला करण्याची हिम्मत नसल्याचा टोला त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला लगावला आहे .

 आज लातूर येथे शिवसेनेचा जिल्हास्तरीय मेळावा संपन्न झाला त्या प्रसंगी देसाई बोलत होते या वेळी मराठवाडा संपर्क  प्रमुख खा चंद्रकांत खैरे , जिल्हा प्रमुख नामदेव चाळक , जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशी , सह संपर्क प्रमुख अभय साळुंके , शिल्पा सरपोतदार ,सौ सुनीता चाळक ,शोभा बेजरगे,बालाजी जाधव विष्णुपंत साठे ,अमित खंडेलवाल ,रमेश माली ,सुभाष काटे ,हरिभाऊ साबदे आदी  उपस्थित होते

लातूर येथे रेल्वे बोगी प्रकल्प आणण्यासाठी तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्याशी चर्चा करून मीच प्रयत्न केले रेल्वे बोर्डाच्या सर्व मागण्या मान्य करून  एम आय डी सी ला पैसे न घेता तात्काळ जमीनही दिले म्हणूनच हे टिकोजीराव भूमिपूजन करू शकले आता या प्रकल्पात भरती होईल त्या वेळी रेल्वे मंत्रालय व माझे उद्योग मंत्रालय मिळून १०० टक्के भरती लातुरातूनच केली जाईल इतरांची लुडबुड चालणार नाही असेही उद्योगमंत्री सुभाष देसाई महाले आहेत या वेळी लातूर ला एम आय डी सी चा विस्तार करणार असल्याचे जाहीर केले

खा चंद्रकांत खैरे यांनी लातूर जिल्ह्यातील खासदारासह सहा च्या सहा विधानसभा मतदार संघात मला सेनेचे आमदार पाहिजेत तेव्हा आपला उमेदवार धनुष्यबाण समजून सैनिकांनी कामाला लागावे गटबाजी खपवून घेणार नाही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात विधानसभेवर भगवा फडकावयाचा निर्धार त्यांनी या वेळी बोलून दाखविला

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment