क्लासेसवर शासनाचे नियंत्रण असावे

Wednesday, June 27, 2018


 क्लासेस चे बाजारीकरण झाले
खासगी कोचिंग क्लास संघटनेची मागणी 


latur : www.mnetaonline.com 

खासगी कोचिंग क्लास चालकांवर शासनाचे नियंत्रण असावे , कायदा करताना शासनाने आकसबुद्धी न ठेवता आमच्या बाजूनेही विचार करावा अशी मागणी लातूर खासगी कोचिंग क्लास संघटनेच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आली लातूर पॅटर्न च्या नावाखाली बाहेरून आलेल्या प्राध्यापकांच्या पदव्यांची तपासणी करावी तसेच विध्यार्थी संख्येवर बंधन आणावे अशी मागणी करण्यात आली आहे 

लातूर खासगी कोचिंग क्लास संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रा विकास कदम सचिव आकडे यांनी संघटनेची भूमिका विशद केली अविनाश चव्हाण यांची हत्या हि लातूरच्या नावलौकिकाला परंपरेला काळिमा फासणारी आहे त्या घटनेचा आम्ही निषेध  करतो असे बोलून विकास कदम म्हणाले मागच्या काळात क्लासेस चे बाजारीकरण झाले असून हाडाचा शिक्षक दुर्लक्षित झाला आहे खासगी कोचिंग  क्लासेस चालकांकडून भरमसाठ फीस वसूल केली जाते त्यात हि मर्यादा असावी तसेच  विद्यार्थी संख्येवर बंधने असावीत परराज्यातील  क्लासेस चे बाजारीकरण केले तसे आम्हाला करता आले नाही परंतु संघटना म्हणून चुकीचे समर्थन करणार नाही असेही ते म्हणाले . 

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment