लातूरच्या कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह : आ अमित विलासराव देशमुख

Wednesday, June 27, 2018


लातूर दि २७ 
स्टेप बाय स्टेप चे संचालक अविनाश चव्हाण यांचे गोळ्या झाडून हत्या ही धक्कादायक, दुर्दैवी घटना घडल्याने शहरातील सर्वसामान्य नागरिकात भीतीचे वातावरण जाणवतंय त्या मुळे कायदा सुव्यवस्थेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होतोय मुळात ज्या पार्श्वभूमीवर ही घटना घडली असे काही घडेल अशी भीती व्यक्त होत असताना आणि चाहूल असताना असे प्रकार घडणे हे जिल्हा  प्रशासनाचे अपयश आहे काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही हे सारे प्रश्न लावून धरणार असल्याचे आ अमित विलासराव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे . 

शस्त्रधारी प्राध्यापक 
शहरातील क्लास चालकाचा वावर पाहूनच धसकी बसते अनेक क्लास मालकांना शस्त्राचे परवाने दिले गेलेत शस्त्रधारी प्राध्यपकांकडून विद्यार्थ्यांनी काय बोध घ्यावा असे बोलून आ अमित विलासराव देशमुख यांनी हा दुर्दैवी प्रकार घडल्या नंतर अद्यापही कोणी शासनाचा प्रतिनिधी वातावरण सुरळीत होण्यासाठी पुढाकार घेत नाही या बद्दल आ अमित देशमुख यांनी आश्चर्य व्यक्त केले 

बेछूट आरोप करायचे नाहीत 
झालेल्या घटनेवर मला राजकारण करायचे नाही कोणावर बेछूट आरोप करायचे नाही परंतु पोलीस अधीक्षकांनी हे का घडले या बाबत पत्रकार परिषद घेऊन सामान्य माणसाला कळवावे अशी अपेक्षा आ अमित विलासराव यांनी व्यक्त केली 



मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment