वीमा कंपनी व कृषी अधिकाऱ्यांची उपस्थिती
लातूर/ प्रतिनिधीं : पिक विमा मिळण्यापासून जे शेतकरी वंचित राहिले आहेत अशांना लवकरात लवकर पिक विमा मिळावा यासाठी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर प्रयत्नशील आहेत .याचाच एक भाग म्हणून मंगळवारी मंत्रालयात बैठक घेण्यात आली .विमा कंपनी व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत लवकरात लवकर विमा रक्कम देण्यासाठी मार्ग काढण्याचे आश्वासन देण्यात आले .
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पेरणीसाठी मदत व्हावी म्हणून पेरणीपूर्वी पिक विमा देण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले होते .परंतु अनेक शेतकऱ्यांना विमा मिळाला नाही . जवळपास 50 टक्के शेतकरी विम्यापासून वंचित राहिले . जिल्हा बँकेने कामात हलगर्जीपणा केल्यामुळे वंचित राहणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली .यातून मार्ग काढण्यासाठी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी मंगळवारी मंत्रालयात बैठक घेतली .या बैठकीस नॅशनल इन्शुरन्स कंपनीचे प्रादेशिक व्यवस्थापक के.के.रैना , विभागीय व्यवस्थापक सचिन महाडिक ,मनोज शिंदे, लातूरचे शाखा प्रबंधक विजय पस्तापुरे ,कृषी विभागाचे अप्पर मुख्य सचिव विजयकुमार ,लातूरचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संतोष आळसे,क्रऊबा उदगीरचे माजी सभापती भगवान पाटील तळेगावकर ,जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके आदींची उपस्थिती होती .
यावेळी लातूरचे शाखा प्रबंधक विजय पस्तापुरे यांनी बँकेकडून डाटा वेळेत न मिळाल्यामुळे विमा मिळण्यास विलंब झाल्याचे सांगितले . यातून लवकरात लवकर मार्ग काढण्याच्या सुचना पालकमंत्र्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या . त्यानुसार शेतकऱ्यांना विमा लवकर मिळावा यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन उपस्थित अधिकाऱ्यांनी दिले .
राज्य शासन व विमा कंपनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पालकमंत्र्यांनी विमा मिळण्याच्या प्रक्रियेला गती दिल्यामुळे जिल्ह्यातील वंचित शेतकऱ्यांना लवकर विमा मिळू शकणार आहे .आगामी काही दिवसातच विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी बैठकीनंतर बोलताना सांगितले
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:
Post a Comment