झोपलेल्या कुंभकर्णाला जागे करायला आलोय - ठाकरे

Saturday, November 24, 2018

अयोध्या :राम मंदिराच्या प्रश्नावर झोपलेल्या सरकार रुपी कुंभकर्णाला जागे करण्यासाठी अयोध्येत आलो आहे .मंदिर लवकर बांधावे यासाठी सरकार अध्यादेश काढणार असेल तर त्यास शिवसेनेचा नक्कीच पाठिंबा असेल ,असे सांगुन मंदीर बांधकामाची तारीख जाहीर करा अशा शब्दात शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी सरकारला आव्हान दिले .
केलेल्या घोषणेप्रमाणे उद्धव ठाकरे पत्नी रश्मी आणि मुलगा उद्धव यांच्यासह आज अयोध्येत पोहोचले .त्यांचा दौरा दोन दिवसांचा आहे. देशातील प्रत्येक हिंदुला अयोध्येत राम मंदीर हवे आहे. मी देखील त्याच मताचा आहे. रामाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येत आलो आहे ,राजकारण करण्यासाठी नाही ,असे ठाकरे म्हणाले.

राम मंदिरासाठी आणखी वाट पाहणे अशक्य आहे .सरकारने एकदाची तारीख जाहीर करून टाकावी असे ते म्हणाले. राम मंदीर बांधण्याचे श्रेय मला नको आहे .राम भक्त म्हणून मी वारंवार येतच राहणार आहे. मंदिराच्या प्रश्नावर देशातील हिंदु आता शांत बसणार नाहीत असेही ते म्हणाले .

अयोध्येत पोहोचल्यानंतर ठाकरे यांचे शिवसेनेच्या वतीने पारंपारिक पद्धतीने जंगी स्वागत करण्यात आले .ठाकरे यांनी साधु संतांची भेट घेऊन लक्ष्मण किला चा दौरा केला .

No comments:

Post a Comment