२७ नोव्‍हेंबर २०१८ पासून गोवर रुबेला लसीकरण मोहिम, लातूर मनपा वतीने राष्‍ट्रीय कार्यक्रमास सहकार्य करण्याचे आवाहन

Saturday, November 24, 2018
संपुर्ण राज्‍यात दिनांक २७ नोव्‍हेंबर २०१८ पासून गोवर रुबेला लसीकरण मोहिम (Measles Rubella-MR) राबविण्‍यात येत आहे.सदरील मोहिमेमध्‍ये ९ महिने ते १५ वर्ष वयोगटातील विदयार्थ्‍यांना गोवर रुबेलाची (Measles Rubella- MR)संयुक्‍त लस दिली जाणार आहे.सदरील मोहिम निश्‍चीत रोजी निश्‍चीत शाळेमध्‍ये सकाळी 9 ते सायंकाळी 5 या प्रामणे दि.8 जानेवारी 2019 पर्यंत राबविण्‍यात येणार आहे. 


लातूर शहर महानगरपालिका क्षेत्रातील सर्व खाजगी शाळा,मनपा शाळा व जि.प.शाळामधून ही मोहिम 27 नोव्‍हेंबर पासून राबविण्‍यात येणार आहे.यासाठी एकूण 356 शाळामधील 1,08,688 विदयार्थ्‍यासाठी लसीकरणाची सोय प्रत्‍येक शाळेमधून करण्‍यात आलेली आहे.दररोज 7 ते 8 शाळामधून ही मोहिम राबविली जाणार आहे.याबाबतची माहिती लातूर शहर महानगरपालिका www.mclatur.org या संकेत स्‍थळावर प्रसिध्‍द करण्‍यात आलेली आहे.

शाळेतील लसीकरण मोहिम संपल्‍यानंतर 9 महिने वयोगटाच्‍या पुढील परंतू शाळेत न जाणा-या विदयार्थ्‍यासाठी बाहय संपर्क सत्रे आयोजीत करण्‍यात येणार आहेत.9 महिने ते 15 वर्ष वयोगटातील एकूण 1,21,143 विदयार्थ्‍यांना सदरील लस इंन्‍जेक्‍शनद्वारे दिली जाणार आहे.

प्रत्‍येक विदयार्थ्‍यासाठी स्‍वतंत्र ए.डी. सिंरीज वापरण्‍यात येणार आहे. सदरील मोहिमेमध्‍ये लसटोचक म्‍हणून ए.एन.एम. यांची नियुक्‍ती करण्‍यात आलेली असून प्रत्‍येक लसटोचकासोबत 3 सहाय्यक कर्मचारी नियुक्‍त करण्‍यात आलेले आहेत. सहाय्यक कर्मचारी म्‍हणून आशा स्‍वयंसेविका,अंगणवाडी कर्मचारी तसेच विविध शासकीय/खाजगी नर्सींग कॉलेजचे स्‍टुडंटस यांची नियुक्‍ती करण्‍यात आलेली आहे. तसेच पर्यवेक्षणासाठी स्‍वतंत्र कर्मचारी नियुक्‍त करण्‍यात आले असून जिल्‍हयातील ग्रामीण रुग्‍णांलयाचे वैदयकिय अधिक्षक, राष्‍ट्रीय बाल स्‍वास्‍थ कार्यक्रमाचे वैदयकिय अधिकारी हे देखील पर्यवेक्षण करणार आहेत.

मा.उपसंचालक,आरोगय सेवा,लातूर परिमंडळ, लातूर यांनी वैदयकिय अधिक्षक यांची पर्यवेक्षणासाठी नियुक्‍ती केलेली आहे.सदरील मोहिम राबविण्‍यासाठी शासकीस वैदयकिय महाविदयालय,तसेच खाजगी डॉक्‍टर्स यांचे सहकार्य घेण्‍यात येत आहे. तरी याची माहिती देण्‍यासाठी शहरातील खाजगी/मनपा शाळांचे मुख्‍याध्‍यापक/नोडल शिक्षक यांची आज दिनांक 24/11/2018 मनपाच्‍या वतीने जिल्‍हा परिषद सभागृह येथे बैठक आयोजीत करण्‍यात आली होती.

सदरील बैठकीस 245 शाळांचे मुख्‍याध्‍यापक/ नोडल शिक्षक उपस्थित होते.यावेळी मनपा उपायुक्‍त श्री संभाजी वाघमारे, जिल्‍हा आरोगय अधिकारी,डॉ.गंगाधर परगे, मनपा आरोग्‍य अधिकारी डॉ.महेश पाटील , ग्रामीण रुग्‍णांलय बाभळगावचे वैदयकिय अधिक्षक डॉ.देशमुख,डॉ.संगीता वीर,डॉ.हरदास, मनपा शिक्षणाधिकारी श्री सोनफुले दामाजी, एकात्मिक बालविकास प्रकल्‍प अधिकारी श्री यादव इ. अधिकारी उपस्थित होते. 

तरी दिनांक 28 नोव्‍हेंबर पासून शाळा चालू होणार असल्‍याने व लगेच दि.27 नोव्‍हेंबर पासून मोहिम चालू होणार असल्‍याने आपला पाल्‍य पहिल्‍या दिवसापासून शाळेमध्‍ये उपस्थित राहील याची काळजी घेणेबाबत व आपल्‍या पाल्‍याचे शाळेमध्‍ये गोवर रुबेला लसीकरण पुर्ण करुन घेवून राष्‍ट्रीय कार्यक्रमास सहकार्य करावे असे आवाहन लातूर मनपाच्‍या वतीने करण्‍यात येत आहे.

No comments:

Post a Comment