पॉस्को कायद्यात सुधारणा करण्याचा प्रस्ताव आहे .यासंदर्भात मंत्रिमंडळ पुढील आठवड्यात निर्णय घेणार आहे. चाइल्ड पोर्नोग्राफीचा व्यावसायिक वापर किंवा त्या संदर्भातील व्हिडिओ पाहिले किंवा त्यांचा संग्रह केला ,वितरण केले तर कठोर शिक्षा प्रस्तावित करण्यात आली आहे. यात आर्थिक दंड आणि कमीत कमी पाच वर्ष तर अधिकाधिक सात वर्षापर्यंत तुरुंगवास होऊ शकतो.
हा गुन्हा अजामीनपात्र आहे .अशा प्रकारात एखादा व्यक्ती पहिल्यांदा आढळला तर पाच वर्ष आणि दुसऱ्या वेळी आढळल्यास सात वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे. सध्या असणाऱ्या कायद्यात यासाठी तीन वर्षांची शिक्षा आणि दंडाची तरतूदआहे . असे फोटो ,व्हिडिओ असतील आणि ते लपवून ठेवल्याचे उघड झाले तर त्यासही शिक्षेची तरतुद आहे .पॉस्को कायद्यातील या सुधारणा प्रस्तावित असुन पुढील आठवड्यात त्याला मान्यता मिळण्याची शक्यता आहे .महिला आणि बालकल्याण मंत्रालय यासाठी आग्रही आहे .

No comments:
Post a Comment