गाडीचा टायर फुटल्याने भीषण अपघातात ५ ठार

Saturday, November 24, 2018
कोल्हापूर रत्नागिरी मार्गावरील रेडे डोह परिसरात शनिवारी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात ४ जण जागीच ठार झाले. तर ६ जण जखमी झाले असून त्यातील २ जणांची प्रकृती गंभीर आहे. गाडीतील अन्य एका दोन वर्षांच्या मुलीचा शोध सुरू आहे. कोल्हापूर पन्हाळा रोडवर तवेरा कारने देवदर्शनाहून घराकडे परतणा-या भाविकांवर काळाने घाला घातला. 


या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील अश्विनी सुनील तांदळे (२६), अनिषा सुनील तांदळे (१४), धनश्री शशिकांत माने (७), जान्हवी सुनील तांदळे (७), बेबी सुनील तांदळे (३) या ५ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये २ महिला आणि ३ लहान मुलींचा समावेश आहे. हे सर्व जण मालगाव रोड मिरज येथील दत्त कॉलनीतील रहिवासी असल्याचे समजते. 

तवेरा (एमएच १५ ईबी ४३४०) कारमधून तांदळे कुटुंबीय गणपतीपुळे येथून देवदर्शन घेऊन तवेरा कारने घराकडे निघाले होते. याचदरम्यान तवेरा गाडीचा टायर फुटल्याने चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या पाण्याच्या डोहात कोसळली. डोहात कोसळलेली गाडी सकाळी बाहेर काढण्यात आली.

No comments:

Post a Comment