ना. पंकजाताई मुंडे, खा. डाॅ.प्रितमताई मुंडे यांच्यामुळे मिळाला अंबाजोगाईच्या वैद्यकीय रूग्णालयास साडे सहा कोटीचा निधी

Friday, August 3, 2018



शवविच्छेदन गृहाचे श्रेणीवर्धन अंतर्गत होणार बांधकाम

बीड दि. ०१ ------ राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे व खा. डाॅ प्रितमताई मुंडे यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे अंबाजोगाई येथील स्वा. रा. तीर्थ शासकीय वैद्यकीय रूग्णालयास राज्य शासनाने सहा कोटी ६५ लाख रूपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. रूग्णालयाच्या शवविच्छेदन गृहाचे श्रेणीवर्धन अंतर्गत इमारतीचे बांधकाम यातून होणार आहे.

   शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने काल या निधीला प्रशासकीय मान्यता प्रदान केली. स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय रूग्णालयाच्या शवविच्छेदन गृहाचे श्रेणीवर्धन अंतर्गत बांधकाम करण्यात येणा-या इमारतीच्या स्थापत्य व विद्युतीकरणाच्या कामाचे अंदाजपत्रक प्रशासकीय मान्यतेसाठी मंत्रालयात दाखल करण्यात आले होते. पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी यासंदर्भात आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्याशी बोलून ही मान्यता मिळवून दिली. या कामासाठी सहा कोटी ६५ लाख ४६ हजार इतका निधी आता उपलब्ध झाला आहे.      

  पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे व खा डाॅ प्रितमताई मुंडे यांनी या अगोदरही अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाच्या विकासासाठी गोरगरीब रूग्णांच्या सुविधांसाठी  मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन दिला आहे. या निधीमुळे तसेच रूग्णालय प्रशासनात सुसूत्रता आणल्याने रूग्णांना चांगली सोय याठिकाणी उपलब्ध झाली आहे. 

No comments:

Post a Comment