लातूर दि.२८-
लातूर जिल्हयात सोयाबीनचे क्षेत्र मोठया प्रमाणवर असून यावर आधरीत तेल प्रक्रिया उदयोग येथे आहेत. परंतु सोयाबीन पासून इतर प्रक्रिया उदयोग उभारणीसाठी जिल्हयात सोयापार्क तसेच उस्मानाबाद जिल्हयात फटाका क्लास्टर निर्माण करुन मोठया प्रमाणत रोजगाराच्या संधी निर्माण केल्या जातील ,असे प्रतिपादन उदयोग मंत्री सुभाष देसाई यांनी केले.
येथील शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात आयोजित लातूर व उस्मानाबाद जिल्हयातील उदयोजकांशी झालेल्या चर्चेत उदयोगमंत्री देसाई बोलत होते. यावेळी औरंगाबाद लोकसभा मतदार संघाचे खासदार चंद्रकांत खेरे, औरंगाबाद औदयोगीक परिक्षेत्राचे मुख्य अभियंता श्री नागे, लातूर प्रादेशिक औदयोगीक विकासचे प्रादेशिक अधिकारी महेशकुमार मेघमाळे लातूर व उस्मानाबाद जिल्हयातील उदयोजक मोठया प्रमाणवर उपस्थित होते.
उदयोगमंत्री देसाई पुढे म्हणाले की लातूर जिल्हयात सोयाबीन पिकाचे क्षेत्र व उत्पादन मोठया प्रमाणावर आहे. त्यामुळे येथे सोयाबीन पिकावर प्रक्रिया करणार्या उदयोगाचे जाळे निर्माण झाल्यास कृषि औदयागीकरणाला चालना मिळेल.याकरिता लातूर जिल्हयात सोया पार्क निर्माण करुन तेल उत्पादनाबरोबरच अनुषंगिक उत्पादने घेतली जातील. तसेच उस्मानाबाद जिल्हयातील तेरखेडा येथील प्रसिध्द ङ्गटाक्याचा व्यवसाय लक्षात घेऊन कारखानदारांसाठी जवळपासच्या परिसरात जागेची उपलब्धता करुन या भागात लवकरच ङ्गटाका क्लस्टर निर्माण करण्यात येईल त्यांनी असे सांगितले.
राज्यातील सर्व सहकारी औदयोगीक वसाहतीबाबत राज्याच्या नवीन औदयोगीक धोरणात समावेश करण्यात येत असून त्यांच्या अडचणी, व भुखंड मालकीबाबत सविस्तर माहिती देण्यात येणार आहे, असे श्री. देसाई यांनी सांगून जुन्या व नवीन सहकारी औदयोगिक वसाहतींना प्रोत्साहन देण्याचे शासनाचे धोरण असल्याचे स्पष्ट केले.
एकात्मीक औदयोगीक क्षेत्र हे नवीन धोरण लागू केल्याने पुर्वीच्या सेझ क्षेत्र मध्ये अडकलेले १० हजार हेक्टर क्षेत्र औदयोगीकरणासाठी उपलब्ध् होणार आहे. तसेच राज्यात सध्या राज्य् औदयोगीक विकास महामंडळ सर्व पायाभूत सोयी सुविधा उदयोगांना उपलब्ध् करुन देत आहे. परंतु खाजगी व सहकारी संस्थांनी औद्योगीक क्षेत्र निर्माण केल्यास त्यास शासन सहकार्य करेल, असे श्री देसाई यांनी सांगितले.
एमआयडीसी क्षेत्रातील उदयोगांना वीज पुरवठा करण्यासाठी सर्व पायाभुत सुविधा वीज वितरण कंपनीनेच कराव्यात व त्या कंपनीस उदयोग विभाग निधी उपलब्ध् करुन देईल. त्यामुळे उदयोगजकांना तात्काळ वीज पुरवठा उपलब्ध् होण्यासाठी असा धोरणात्म्क निर्णय घेण्यात असल्याची माहिती श्री. देसाई यांनी दिली.
एमआयडीसी क्षेत्र ग्रामपंचायतीच्या ह्दृीत येत असेल तर त्या ठिकाणाचा मालमत्ता कर यापुढे एमआयडीसी वसुल करुन ५० टक्के हिस्सा ग्राम विकास विभागाला तर ५० टक्के करातून एमआयडीसी त्या औदयोगीक क्षेत्रात सर्व पायाभुत सुविधा उपलब्ध् करेल तसेच अतिरिक्त् निधी ही एमआयडीसी देईल याबाबत ग्राम विकास विभागाशी सकारात्मक चर्चा झालेली असून त्या निर्णयाची लवकरच अमलबंजावणी केली जाईल, असे श्री. देसाई यांनी स्प्ष्ट केले. यावेळी भुखंड वाटप , मुद्रांक शुल्क् अतिरिक्त् औदयागिक क्षेत्र, बँक कर्ज पुरवठा, कृषि उदयोग, पायाभुत सुविधा अदिबाबत श्री. देसाई यांनी सविस्त्र मार्गदर्शन करुन उदयोजकांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन कटिबध्द असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रारंभी लातूर प्रादेशिक औदयोगिक क्षेत्राचे अधिकारी महेश कुमार मेघमाळे यांनी लातूर व उस्मानाबाद जिल्हयातील उदयोग संस्था, बंद व चालू उदयोग, नवीन औदयोगिक क्षेत्र, पाणी पुरवठा, पायाभुत सुविधा आदिची माहिती पॉवर पाईंटद्वारे सादर केली. तसेच लातूर जिल्हयात सोयाबीन पिकाचे क्षेत्र व उत्पादन यामध्ये सन २०००-२००१ ते २०१७ -१८ या कालावधीत ४० पटीने वाढ झालेली असून तेल उत्पादनाशिवाय इतर अनुषंगिक उदयोग उभारणीस येथे वाव असल्याचे त्यांनी सांगितले. लातूर व उस्मानाबाद जिल्हयातील उदयोजकांनी आपल्या औदयोगीक क्षेत्रातील पायाभुत सुविधा व समास्यांची माहिती देऊन त्या सोडविण्याची मागणी केली.
यामध्ये भुखंड वाटप, सरळ पध्दतीने कारणे वीज कनेक्श्न, मालमत्ता कर, सहकारी औदयोगीक वसाहतींच्या समस्या, बँक कर्जपुरवठा, स्टँप डयुटी, बंद पडलेले उदयोग, ई- सेवा केंद्र निर्माण करणे आदि बाबी उदयोजकांनी मांडल्या. व त्यावर साकारात्म्क दृष्टीने कार्यवाही करण्याची आपेक्षा व्यक्त केली
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर
No comments:
Post a Comment