राज्य सरकारच्या भुमिकेकेडे लक्ष
तुळजापुर दि २८ वार्ताहर
सकल मराठा समाज क्रांती मोर्चाच्या वतीने मराठा अारक्षण मागणीच्या दुस—या पर्वाला शुक्रवार पासुन भवानीमाते समोर जागरण गोंधळाने सुरूवात होत अाहे. सकाळी ११ वाजता विशाल जनसमुदायाच्या साक्षीने महाव्दारासमोर देवीला साकडे घातले जाणार अाहे.
श्री.तुळजाभवानी मंदिराच्या महाव्दारासमोर रकाळी ११ वाजता देवीचे वंशपरंपरागत गोंधळी राजाभाऊ गायकवाड व त्यांचे सहकारी मराठा समाजाच्या विविध मागण्या जागरण गोंधळातुन देवीसमोर सादर करून देवीला साकडे घालणार अाहेत.
राज्यातील विविध जिल्हयातुन मराठा अारक्षणासाठी पाठपुरावा करणारे नेते यावेळी उपस्थित राहणार अाहेत. राज्यसमन्वयक अाबासाहेब पाटील नी तुळजापुरात सात दिवस मुक्काम ठोकुन जागरण गोंधळ कार्यक्रमाची तयारी केली अाहे. याप्रसंगी चळवळीचे नेते राजेंद्र केरे पाटील ( औरंगाबाद ),महंत तुकोजी महाराज, महंत मावजीनाथ महाराज, महंत सोमवारगिरी महाराज, तुळजाभवानी पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज्जन साळुंके, तुळजाभवानी भोपे मंडळाचे अमरराजे परमेश्वर, शिवबाराजे प्रतिष्ठान अध्यक्ष अर्जुन साळुंके, छावाचे विभागीय अध्यक्ष जीवनराजे इंगळे, शिवमुद्राचे अध्यक्ष किशोर पवार हे मान्यवर जागरण गोंधळास उपस्थित राहणार अाहेत.
गर्दीचा अंदाज घेवुन चार पार्कीग मध्ये वाहनांची पार्कींग केली जात अाहे. स्वच्छतागृहांचीउभारणी दोन ठिकाणी असेल, सात ठिकाणी पाणपोई उभारणी केली अाहे. शिवाजी महाराज पुतळ्यास पुजा करून कार्यक्रमाला सुरूवात होणार अाहे. तेथुन रॅली व्दारे तुळजाभवानी महाव्दार येथे अाल्यानंतर देवीचे परंपरागत गोंधळी राजाभाऊ गायकवाड व सहकारी मराठा समाजाच्या मागण्यांचे साकडे येथे सादर होणा—या जागरण गोंधळातुन घालणार अाहे. सुमारे दोन तास हा जागरण गोंधळाचा कार्यक्रम चालणार अाहे.
देवीच्या दरबारात मराठा समाजाच्या मागण्यांचा हा गोंधळ राज्य सरकारला जागे करण्यासाठी अाहे, सतत खोटया अाश्वासनावर समाजाचा विश्वास राहिलेला नाही, ५८ विराट मोर्चे काढल्यानंतरही सरकार फसव्या घोषणाबाजीचा खेळ थांबलेला नाही मराठा समाज अारक्षणाची मागणी सातत्याने करीत असताना सरकार सतत चालढकल करीत अाहे, शैक्षणिक क्षेञासाठी उपयुक्त अारक्षण मिळाले पाहिजे, शासनाचे परिपञकांचा खेळखंडोबा सुधारला पाहिजे यासह इतर मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी दुस—या पर्वाचे अांदोलन अाज सुरू होत अाहे अशी माहिती स्थानिक समन्वयक किशोर पवार यांनी सांगितले.
सुमारे १५ हजार समाजबांधव गोंधळ कार्यक्रमासाठी येत असुन मुक्कामाला येणा—यांची पाच भक्त निवासात राहण्याची सोय केली अाहे. शांततेत सदर अांदोलन पार पाडण्यासाठी सर्वाना सुचना केल्या असुन देवीच्या दरबारात सरकारच्या नाकर्तेपणावर बोट ठेवणारा हा कार्यक्रम मराठा अारक्षण अांदोलन अाज पासुन राज्यभर दुसरे पर्व म्हणुन केले जाणार अाहे.
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:
Post a Comment